आयुष्यात येणाऱ्या समस्यांना न झुकता सामोरे गेल्याने यश मिळवता येतं, याचं उत्तम उदाहरण आयएएस अधिकारी किंजल सिंह यांनी घालून दिलं आहे. वडिलांचा खून अन् आईचं निधन झाल्यानंतर न खचता किंजल यांनी त्यांचा अभ्यास चालू ठेवला. याचं फळ त्यांना मिळालं आणि त्या २५ वी रँक मिळवून आयएएस झाल्या. त्यांचा हा प्रवास, त्यांच्या आईचा संघर्ष आणि अखेर वडिलांना मिळालेला न्याय याबाबत जाणून घेऊयात.

किंजल सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९८२ रोजी उत्तर प्रदेशमधील बलियामध्ये झाला होता. त्या अवघ्या दोन वर्षांच्या असताना त्यांचे वडील पोलीस उपअधीक्षक केपी सिंह यांची त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे बनावट चकमकीत हत्या केली होती. तेव्हापासून किंजल यांना वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आईबरोबर गावाहून दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात नियमितपणे जावं लागत होतं.

पती व मुलगी भारतात परतले, ती काम करण्यासाठी थांबली अन्…; येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या परिचारिकेची कहाणी

केपी सिंह हे प्रामाणिक पोलीस अधिकारी होते. मुख्य आरोपी सरोजवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप होते. जेव्हा सरोजला समजलं की त्याच्या चुकीच्या कामाचा पर्दाफाश सिंह करू शकतात, तेव्हा त्याने केपी सिंह यांना माधवपूरला जाण्यास भाग पाडलं. तेथील गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या बहाण्याने त्यांना नेलं. पण तिथे कोणीच नव्हतं, त्यांनी मागे वळून पाहिलं तर सरोज तिथे उभा होता. सरोजने त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या. नंतर सिंह यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या बनावट चकमकीत सुमारे १२ गावकऱ्यांचीही हत्या करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

किंजल यांच्या आईचे नाव विभा होते. पतीचं निधन झालं तेव्हा विभा गरोदर होत्या, सहा महिन्यांनी त्यांनी मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव प्रांजल ठेवलं. विभा यांनी दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा भार आपल्या खांद्यावर उचलला आणि पतीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला. वडिलांचं निधन आणि दिल्लीला न्यायालयीन सुनावणीसाठी प्रवास हे सांभाळूनही किंजल यांनी खूप अभ्यास केला आणि दिल्लीच्या प्रतिष्ठित लेडी श्री राम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. पण त्यांना आणखी एक धक्का बसला. त्यांच्या आईला कर्करोगाचं निदान झालं. या आजाराशी लढतानाच २००४ मध्ये त्यांचं निधन झालं. निधनाआधी आईला मुलींनी आश्वासन दिलं होतं की त्या आयएएस अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करतील आणि आपल्या वडिलांना न्याय मिळवून देतील.

शाब्बास पोरींनो! ५० लाखांच्या भांडवलातून ५०० कोटींचा व्यवसाय; तरुणींचे फोर्ब्सच्या यादीत झळकले नाव

पालकांबद्दल बोलताना किंजल म्हणाल्या होत्या, “मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. ते एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी होते. माझ्या आईने एकल माता असूनही आमचा हिमतीने सांभाळ केला आणि आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला.” आईच्या निधनानंतर किंजल कॉलेजमध्ये अंतिम परीक्षा देण्यासाठी परतल्या आणि दिल्ली विद्यापीठात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नंतर धाकटी बहीण प्रांजललाही त्यांनी दिल्लीला बोलावलं. दोघी बहिणींनी मिळून आपल्या वडिलांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवास सुरू केला. दोघींनी युपीएससी परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केलं. अथक परिश्रमाने किंजल यांनी २००८ मध्ये युपीएससी परीक्षा पास केली. त्या ऑल इंडिया २५ वी रँक मिळवून दुसऱ्या प्रयत्नात IAS झाल्या. तर प्रांजलने २५२ वी रँक मिळवून परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती आयआरएस अधिकारी आहे.

अधिकारी झाल्यानंतर या दोघी बहिणींनी वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचा खून करणाऱ्यांना अटक व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिलेल्या लढ्याला यश आलं आणि अखेरीस त्यांच्या बाजूने निकाल लागला. २०१३ मध्ये न्यायासाठी तब्बल ३१ वर्षे लढा दिल्यानंतर लखनऊमधील सीबीआय विशेष न्यायालयाने डीएसपी सिंह यांच्या हत्येस जबाबदार असलेल्या सर्व १८ आरोपींना शिक्षा सुनावली.

कोण आहेत नवाज मोदी? गौतम सिंघानियांपासून विभक्त झाल्याने आहेत चर्चेत

या विजयाबद्दल बोलताना किंजल म्हणाल्या होत्या, “माझ्या वडिलांचा खून झाला तेव्हा मी जेमतेम अडीच वर्षांची होते. माझ्याकडे त्यांच्या कोणत्याही आठवणी नाहीत. माझ्या आईचं २००४ मध्ये कॅन्सरने निधन होईपर्यंत सर्व अडचणींवर मात करत वडिलांना न्याय मिळावा यासाठी तिने संघर्ष कसा चालू ठेवला, ते मला आठवतं. आज ती जिवंत असती तर तिला खूप आनंद झाला असता याची मला खात्री आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, किंजल सिंह या आधी लखीमपूर खेरी आणि सीतापूरच्या जिल्हा दंडाधिकारी होत्या. या वर्षी त्यांची उत्तर प्रदेशच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या डीजीपदी नियुक्ती झाली.