-गीता प्रसाद

स्त्रियांमध्ये मद्यपानाचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे हे सर्वश्रुत आहेच, मात्र ही दारू अनेक स्त्रियांना मरणाच्या दाढेत लोटत आहे, याची मात्र अनेकांना कल्पना नसेल. आणि हे प्रमाण थोडेथोडके नाही, तर दरवर्षी ते १४.७ टक्क्यांनी वाढत आहे. यातली गांभीर्याची गोष्ट म्हणजे यात ३० ते ४० वयोगटातल्या स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील मद्यपान करणाऱ्या लोकांच्या आरोग्याचे The Journal of the American Medical Association ने केलेले सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यात हा आकडा दिला गेला आहे.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार

गेल्या काही वर्षांपर्यंत मद्यपान करणारे म्हटले की ते पुरुषच असणार हे गृहीत धरले जायचे, मात्र अलीकडे मद्यपान करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येतही खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, अगदी भारतातसुद्धा. कुणी तरी सांगितलेले असते, की रोज एक ग्लास वाइन पिणे आरोग्यासाठी हितकारक असते, मग अनेक जण फारशी माहिती न घेता त्याची अंमलबजावणी सुरू करतात. २०१८ ते २०२० दरम्यान मद्यपानाच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडलेल्या स्त्रियांची संख्या १४.७ टक्क्यांनी वाढली आहे. यात लिव्हर- यकृत तसेच gastrointestinal- जठर वा आतड्यांच्या आजारांचा समावेश आहे.

आणखी वाचा-स्त्री आरोग्य : पाळीत रक्तस्त्राव कमी झाल्यास वजन वाढतं?

आजकाल स्त्रियांमध्येही मद्यपान करणे हे ‘कूल’ मानले जाते. ‘त्यात काय?’ हा ॲटिट्यूड वाढत चालला आहे. स्त्रियांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढण्याचे कारण सांगताना डॉक्टर असणाऱ्या आणि ‘द ॲडिक्शन फाइल्स’ या पॉडकास्टच्या निर्मात्या पॉला कुक विस्तृतपणे हा विषय मांडतात. मद्यपान करणे हे आता स्त्रियांमध्ये सर्वमान्य होत आहे. जबरदस्त मार्केटिंग हे यामागचे मोठे कारण आहे. अलीकडे अनेक मद्यविक्रेत्या कंपन्या स्त्रियांना आपला ‘टार्गेट ग्रुप’ बनवून जोरदार कॅम्पेनिंग करतात. सातत्याने केलेल्या अशा जाहिरातींमुळे स्त्रियांच्याही मनात मद्यपानाविषयी ‘सकारात्मक भाव’ निर्माण होत असावेत.

अमेरिकेतील या मद्यपानविषयक सर्वेक्षणाचा आणखी एक निष्कर्ष म्हणजे, हे व्यसन लागणाऱ्यांमध्ये ६५ आणि त्यावरील वृद्ध स्त्रियांचे प्रमाणही गेल्या चार वर्षांत ६.७ टक्क्यांनी वाढले आहे. यामागे अर्थात नेमकी कारणे काय आहेत, हे अद्याप समजलेले नसले, तरीही एकटेपणा, चिंता, नैराश्य हे याचे कारण असू शकते. शरीराचे थकलेपण आणि आप्त जवळ नसणे यामुळे येणारे एकटेपण हा तर अनेक वृद्धांचा अनुभव आहे. अर्थात आपल्याकडे तरी मद्याचा स्वीकार इतक्या सहजपणे केला जात नाही, विशेषत: वृद्ध स्त्रियांच्या बाबतीत असे घडणे फारच कमी.

आणखी वाचा-सासू कशी असावी? चांगली सासू होण्यासाठी काय करावे? जाणून घ्या या खास टिप्स

पण मद्याच्या वाढत्या व्यसनामागे स्ट्रेस- तणाव हे मोठे कारण असल्याचे डॉ. पॉला सांगतात. ताण- मग तो व्यावसायिक कारणांमुळे असेल वा नातेसंबंधांतील, अनेक जणी या ताणांना दूर ठेवण्यासाठी दारूला जवळ करतात आणि मग एकदा का त्याची सवय झाली की मग त्यातून बाहेर कसे पडायचे हेच अनेकींना कळत नाही. दुसरे कारण घटस्फोट. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीची प्रतारणा किंवा विरह अनेकींना सहन होत नाही. त्या कोलमडून पडतात. अशा वेळी त्यांना सावरणारे कुणी नसेल तर खूप जणी दारूच्या अधीन होतात आणि दिवसेंदिवस अधिकाधिक त्यात अडकत जातात. अनेकदा यामुळे आणखी प्रश्न निर्माण होतात. नोकरी वगैरे गेली तर पैशांचा प्रश्न निर्माण होतो. मग अधिक ताण- मग अधिक दारू आणि त्यातून येणारे एकटेपण हे एक चक्र तयार होते आणि अनेक जणी अधिक दु:खी होतात, एकट्या पडतात. काही जणींना मृत्यू जवळ करतो.

संशोधकांनुसार अति मद्यपान स्त्रियांना मृत्यूच्या जवळ नेते याचे वैद्यकीय कारण म्हणजे, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरात पाण्याचा कन्टेन्ट जास्त असतो आणि बॉडी फॅटही जास्त असते. त्यामुळे दारू स्त्रियांच्या शरीरावर नकारात्मक परिणाम करते. त्यांच्या शरीरात दारू सहजपणे पचली जात नाही. त्यामुळे स्त्रियांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात टॉक्सिन्स साचून राहतात. त्याचा शरीरावर अपायकारक परिणाम होतो, असेही डॉ. पॉला कुक सांगतात. म्हणूनच ‘अति तिथे माती’ या न्यायाप्रमाणे मद्यपानाची आवड व्यसनात बदलू न देणे, हेच हितकारक.

lokwomen.online@gmail.com