नागपुरातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या आणि दुबईतील पहिल्या महिला डॉक्टर ठरलेल्या झुलेखा दौड यांची आज सुसज्ज अशी तीन रुग्णालये आहेत. एवढंच नव्हे तर दुबईतील सर्वांत श्रीमंत भारतीय महिलांमध्ये त्यांची गणना होते. परदेशी भारतीयांसाठी सर्वोच्च मानला जाणारा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार २०१९ ने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. डीएनए या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
झुलेखा यांचे वडील बांधकाम कामगार होते. तसंच, ते नागपुरात रोजंदारीवर काम करत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनही झुलेखा यांनी डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं. महाराष्ट्रातून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी १९६४ मध्ये युनायटेड अरब अमिराती (UAE) येथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. डॉ. झुलेखा दाऊद या दुबईत औषधोपचार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
हेही वाचा >> १२३ कोटींचं दान करणारी पाकिस्तानी व्यावसायिक शन्ना खान नक्की कोण? ईशा अंबानीपेक्षाही जास्त संपत्तीची मालकीण
१९६४ मध्ये दुबईला गेल्या तेव्हा त्या स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून गेल्या होत्या. परंतु, तेव्हा तिथे सर्वचप्रकारच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची गरज होती. ही गरज ओळखूनच त्यांनी पुढे सर्व आजारांबाबत प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, असा संदर्भ बीबीसी मराठीने दिला आहे. सुरुवातीच्या काळात दुबईमध्ये मुलभूत सुविधाही उपलब्ध नव्हत्या. अशा परिस्थितीतही त्यांनी रुग्णसेवा केली. त्यानंतर, १९९२ साली दुबईमध्ये झुलेखा रुग्णालय सुरू केलं. आज या रुग्णालय समूहाची विविध ठिकाणी रुग्णालये आहेत. या रुग्णालय समूहाच्या त्या अध्यक्षा आहेत.
फोर्ब्सच्या यादीतही नाव
चिकित्सक उद्योजक असलेल्या झुलेखा दाऊद यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परदेशी भारतीयांसाठी सर्वोच्च मानला जाणारा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार २०१९ त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तर, फोर्ब्स मिडल इस्टच्या युएईमधील टॉप १०० भारतीय नेत्यांच्या यादीतही झुलेखा यांचा समावेश होता.
हेही वाचा >> जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पारुल चौधरीचे यश! जाणून घ्या तिच्याविषयी…
महाराष्ट्रातही सेवा
दुबईत स्थिरस्थावर झालेल्या झुलेखा या मूळच्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातही रुग्णालय उभारले आहे. जागतिक बँकेसोबत १९८ कोटींचा करार करून नागपुरात सुसज्ज असे रुग्णालय उभारले आहे.