मेन्टॉरिंग या शब्दाचा कॅनव्हास खूप मोठा आहे, असं मला वाटतं. म्हणजे बघा ना, आयुष्यात अनेक माणसं आपल्याला भेटतात. काही माणसं आपल्याला कसोटीच्या प्रसंगी योग्य ते मार्गदर्शन करतात, तर काही आपल्याला सहजगत्या प्रेरित करून जातात; त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून! या दोन्हीमध्ये अत्यंत सूक्ष्म व तरल रेषा आहे. त्यामुळे मला प्रेरणा देणाऱ्या अनेक जणांनी, आयुष्य जाणून घेण्यासाठी व दुर्मीळ जीवनमूल्यांची रुजवण करण्यासाठी नकळतपणे मेन्टॉरिंग केलंय! आपण कायम घरातल्यांचे टिपिकल शब्द ऐकत मोठे होतो. ‘आमचे संस्कार खूप चांगले आहेत. आमची मुलं वावगं वागणारच नाहीत.’ संस्कारांचं मोल मान्य आहे; पण ते एका ठरावीक वयापर्यंत! पुढे तुमचे व्यक्तिगत अनुभव आणि तुमचा स्वतःचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचं आयुष्य घडवत असतो. माझ्या आई-वडिलांनी मूलभूत संस्कारांच्या पलीकडे मला दिला तो नेमका हा निकोप, स्वतंत्र दृष्टिकोन!

आणखी वाचा : ‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

मी या क्षेत्रांत पाय ठेवला, तेव्हा अर्थातच मनात भीती होती, शंका होत्या. मी बाबांना म्हटलं, “बाबा, लोक म्हणतात, की हे मनोरंजनाचं क्षेत्र चांगलं नाही. तुम्हाला काय वाटतं?” त्यांनी छान समजावलं मला! ते म्हणाले, “भार्गवी, चांगली आणि वाईट माणसं सगळ्याच क्षेत्रांत असतात. स्त्रियांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन, मग तो शारीरिक पातळीवरचा असो वा मानसिक दबावाचा असो, तो कधीच सर्वत्र सारखा अथवा नेहमीच चांगला असणार नाही. तुला नीरक्षीरविवेकाने माणसं निवडून तुझ्याभोवती एक वलय निर्माण करायचं आहे.” बाबांना नेमकं काय सुचवायचं आहे ते मला अचूक कळलं. असंच एकदा मी बाबांशी वाद घालत होते, “एखाद्याला कामासाठी भेटायला जाताना अंगभर कपड्यात किंवा विशिष्ट वेशभूषेतच गेलं पाहिजे असं का? गेले तोकड्या कपड्यांत तर काय झालं? माझ्या कपड्यांचा माझ्या अभिनयाशी अथवा कामाशी काय संबंध?” बाबा नेहमीप्रमाणे हसले, शांतपणे. म्हणाले, “तू कशी आहेस किंवा तुझा अभिनय किती ताकदीचा आहे हे तुझ्या कपड्यांवर ठरत नाही हे अगदी मान्य! पण तुझ्या कपड्यांवरून व वागण्या-बोलण्यातून तुझ्या कामाचा फोकस त्या माणसाला दिसतो आणि तो त्या माणसाला दिसणं हे जास्त गरजेचे आहे, भार्गवी! लक्षात घे. आज आपण ‘पिंक’सारखे चित्रपट करत असलो तरी तोकड्या, अगदी कमी कपड्यांत पहिल्यांदा भेटायला येणाऱ्या मुलीबद्दलचा दृष्टिकोन, भारतात तरी चांगला असणार नाही. आपण परंपरा जपल्या पाहिजेत, रूढी नाहीत; पण दुर्दैवाने आपल्याकडे रूढीच जपल्या जातात आणि परंपरांचा विसर पडतो आपल्याला!” अलीकडेच मला काही पालकांनी विचारलं, “आमच्या मुलींना या क्षेत्रात पाठवावं का आम्ही?” त्याही वेळी मला बाबांचा गुरुमंत्र आठवला. ते म्हणाले होते, “आजकाल कोणीही कोणावर जबरदस्ती करायला शक्यतो धजत नाही. तुम्ही तुमचा मार्ग ठरवता, की कोणत्या मार्गाने आपल्याला यश मिळवायचं आहे. भार्गवी, यश मिळवण्यासाठी तू असा मार्ग निवड की रात्री तुला शांत झोप लागेल! बाकी आम्ही सदैव तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूच! पण निर्णय तुलाच घ्यायचाय आणि त्याच्या परिणामांनाही तुलाच सामोरं जायचं आहे एवढं लक्षात ठेव.”

आणखी वाचा : केवळ ३१ टक्के भारतीय महिलांहाती मोबाईल! ; डिजिटल दरी वाढतेय!

दुर्दैवाने माझा घटस्फोट झाला तेव्हा त्यांनी त्यांचे बोल खरे केले. मला म्हणाले, “या सगळ्यातून बाहेर पडायला दोन वर्षं स्वतःला दे. स्वतःच्या पायावर उभी राहा. ते नाही जमलं तर दोन वेळची पोळीभाजी घालायला आम्ही समर्थ आहोत.” आई-बाबांनी असा विश्वास टाकल्यामुळेच मी आयुष्यात आत्मविश्वासाने ठामपणे उभी राहिले. आईने मला पुस्तकं वाचायला शिकवली, तर बाबांनी माणसं वाचायला शिकवलं, भरपूर प्रवास करायला शिकवलं. अभिनय क्षेत्रासाठी त्याचा मला खूप उपयोग झाला. मी सहावीत असताना कमलाकर सारंगकाकांसोबत ‘दूरदर्शन’साठी पहिली मालिका केली होती. फारसं काही कळायचं नाही. मी सेटवर झोपून जायची. सारंग काका धिप्पाड! ते चक्क मला कडेवर घेऊन शॉटसाठी जायचे. त्यांनी मला त्या लहान वयात अभिनयाचे जे धडे शिकवले ते आजही उपयोगी पडतात. देबू देवधरांनी मला अनेक तांत्रिक गोष्टी शिकवल्या. कॅमेराचा अँगल, पोझिशन सगळं ते छान सांगायचे. देबूदांनी मला जे शिकवलं, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी काय करते? नवोदित कलाकारांना, ज्यांना हे तंत्र ठाऊक नाही वा जमत नाही त्यांना मी ते शिकवते. देबूदा हयात नसले तरी त्यांना नक्कीच समाधान वाटत असेल याचं, असं मला वाटतं! कारण गुरूंची परंपरा शिष्य पुढे नेतो याचं समाधान खूप मोठं असतं.

आणखी वाचा : मेनिक्युअर-पेडिक्युअर करताय?… नखांसाठी लक्षात घ्या या टिप्स

समाधान आणि आनंद असा टिपायचा असतो- माणसांमधून! प्रसंगांमधून! बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’मध्ये मी प्रयोग करायला गेले आणि आयुष्यभर पुरून उरेल असं संचित गाठीशी बांधून आले. अपंग शकुंतला, हसतमुख! सदा उत्साही! तिने मला चहाला बोलावलं. स्वतः माझ्यासाठी चहा-भजी केली. कशी केली ठाऊक आहे? चक्क पायांनी! ती पायाने ग्रीटिंग्ज बनवते. मला मोबाइलवर मेसेज टाइप करून पाठवते. गणपती बाप्पाची चित्रंही पायाने काढते. एक मोठा धडा गिरवला मी तिला पाहून! आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे आहे, त्याचा आनंद मानून जगू या! जगायला काय लागतं? दोन वेळची पोळीभाजी आणि डोक्यावर छप्पर! सुदैवाने ते आहे ना माझ्याकडे. मग तक्रार कसली करायची? ‘आनंदवना’त प्रयोगासाठी पहिल्यांदा गेले, तेव्हा माझ्याकडे अनेकांनी देणगी दिली होती. मी ती तिथल्या कर्मचाऱ्यांना दिली आणि त्यांना म्हटलं, “तुम्हाला माझ्याकडून आणखी काही वस्तू वा पैसे हवेत का?” ते म्हणाले, “खरं सांगायचं तर तुमचे पैसे नको. वस्तू नको. मात्र तुमचा वेळ हवा!” त्या वाक्याने मी अंतर्बाह्य हलले. मग मी ठरवलं, की आनंदवनात दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा आहे. त्या मुलांना डान्स शिकवायला जायचं. मी ते सुरू केलं. अंध, अपंग, मूकबधिर सगळे एकत्र डान्स शिकत. त्यांच्याकडे नृत्यासाठी कपडे अथवा मेकअपचं सामान नव्हतं. दीपाली, फुलवा, अतुलदादा आणि माझ्या अनेक कलाकार मित्र-मैत्रिणींनी भरपूर मेकअपचं सामान दिलं, कपडे दिले. त्यांनाही आनंद झाला. ही घटना खूप काही शिकवून जाणारी. पाय जमिनीवर ठेवायला भाग पाडणारी. वैगुण्य, उणिवांवर मात करत आनंदाने कसं जगायचं हा धडा मीच त्यांच्याकडून शिकले. अनेक अवघड प्रसंगांत हा मोलाचा धडा मला उभारी देऊन जातो.
madhuri.m.tamhane@gmail.com