अनुज हल्ली फारच त्रास देतोय गं. होमवर्क लिहूनही आणत नाही. मला ग्रुपवरून मिळवावं लागतं. माझ्यासोबत अभ्यासाला बसायलाही कटकट करतो. बसला तरी हजार नखरे. पंधरा मिनिटांचं होमवर्क, तास झाला तरी अर्धवट असतं. ‘तू नको, माझं मी करतो’ म्हणे. असं कसं? याच्या चुका झाल्या तर मला कसं कळणार? चौथीत गेल्यावर शिंगं फुटलीत. हट्टीपणा नुसता.” नेहा शेजारच्या वरदाकडे तक्रार करत म्हणाली.

हेही वाचा- नातेसंबंध: आईवडील लग्नासाठी मागे लागले आहेत?

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश

“माझ्याकडे येतोस का अनुज? आमच्या खिडकीजवळ तुझ्या आवडत्या जागी बसून संपव होमवर्क.” वरदानं विचारलं. अनुज लगेच तयार झाला. गप्पा मारत, वरदानं दिलेला खाऊ खात, अडलेलं विचारत, त्यानं होमवर्क संपवलं. बोलता बोलता वरदानं सहज विचारलं, “चांगला पटापट होतोय की तुझा अभ्यास. थोडंसंच अडलं. मग तुझी आई काय सांगत होती?”

“आईसोबत अभ्यास करायला बोअर होतं.” अनुज म्हणाला.

“का बरं? ”

“मावशी ती ना फार घाई करते. तिला वेळ असतो तेव्हाच आणि तेवढ्याच वेळात मी करायला पाहिजे. ती सारखं ‘पटपट आवर’ म्हणायला लागली की मी पण मुद्दाम हळूहळू करतो. ”
“असा त्रास देतात का आईला?”

“अगं, ती ना, मला माझं माझं करूच देत नाही. तू कशी, मी विचारलं तेवढीच मदत केलीस? माझ्या मागे लागली नाहीस. आई अशी वाटच पाहात नाही. लगेच उत्तर सांगून टाकते. वर म्हणते, “ए चेंगटमामा, कशी पटापट उत्तरं देता आली पाहिजेत.” आठवायला थोडा वेळ लागणार की नाही? तूच सांग. मी तर आता आईसोबत अभ्यास करणारच नाहीये.” अनुजनं जाहीरच करून टाकलं.
“पण तुला अडलं तर?”

“अडलेलं आईला विचारलं, की ती तेवढंच नाही सांगत. खूप आधीपासूनचं सांगते आणि वर, एवढं कसं तुला येत नाही? असंही वर म्हणते. तेव्हा वेळ गेलेला चालतो तिला.” अनुजने तक्रार केली.

हेही वाचा- आता एकटी मुस्लिम महिलाही करु शकणार ‘हज’ यात्रा; ‘मेहरम’अर्थात गार्डियनसंदर्भातला नियम शिथील

“अनुज काय म्हणाला?” असं नेहानं दुसऱ्या दिवशी विचारल्यावर, वरदानं झालेला संवाद थोडक्यात सांगितला.

“तू खरंच घाई करून त्याला चेंगट म्हणतेस का?”

“हो, पण अगं मला वेळ तेवढाच असतो ना? मग त्यानं पटापट करायला नको का?”

“अगं, पण वेळ नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे. तो लहान आहे, शिकतोय, तर तुझ्या वेगानं तो कसं करेल? तू त्याच्या शिकण्याच्या प्रोसेसच्या मधेमधे करतेस, हे लक्षात येतंय का तुझ्या?”

“अगं, पण आत्ताच वेग वाढला पाहिजे ना?”

“मग तुमची जी खणाखणी चालते, त्यामुळे त्याचा लिहिण्याचा वेग वाढतो की समजण्याचा? वर दोघांचीही चिडचिड. पण हट्टी मात्र तो, बरं का. ‘पटपट कर’ असा तूही हट्टच तर धरत नाहीयेस का? तुझ्या कामात कुणी घाई केली, मध्येमध्ये केलं, सल्ले दिले, नावं ठेवली तर कशी रिअॅक्ट होतेस ते मी पाहिलंय.”

हेही वाचा- सॅलीला सॅल्यूट! …एक धाव मदतकार्यासाठी!

नेहा विचारात पडली. अभ्यासामुळे घडलेले एपिसोड एखादी फिल्म पाहिल्यासारखी तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले. “घाई नको हे ठीक आहे, पण म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं? करेल ते करू द्यायचं?”

“मी असं कधी म्हटलं? अडलेलं तुला विचारावं असं त्याला वाटलं पाहिजे ना? म्हणून लक्ष असलं, तरी शेजारी बसून एकेका शब्दावर कॉमेंट नाही करायची. ‘एवढं कसं येत नाही?’ असं न म्हणता, समजावून सांगून दुरुस्त करायचं. नाहीतर, अभ्यास घेणं म्हणजे त्याला रागावणं आणि चुकीचा, बावळट ठरवणं असं होतंय ग नकळतपणे. अनुज सिन्सिअर आहे नेहा, अजून तरी अभ्यासाचा कंटाळा करत नाही, पण रोज कटकट झाली तर अभ्यासच नकोसा होऊ शकतो. त्यामुळे, अभ्यास करताना त्याला शिकण्यासाठी सोबत द्यायची, की चुका शोधत पहारा करायचा, हा चॉइस तुझाच आहे.” वरदा म्हणाली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com