शेजारची साक्षी माहेरी आली होती. बऱ्याच दिवसांनी तिची भेट झाली, मीही जरा निवांत होते, म्हटलं चला जरा गप्पा मारुयात. तिला आवाज दिला आणि आमच्या गोष्टी सुरू झाल्या. मागच्या वर्षी साक्षीचं लग्न झालं, ती नोकरीही करते, त्यात आमची बऱ्याच दिवसांनी भेट झाली. त्यामुळे दोघींजवळ बोलायला भरपूर विषय होते.

तासभराच्या प्रवासात मला पहिल्यांदाच भेटलेली ‘ती’!

lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
Ganesh Chaturthi 2024 This Year's Ganesh Chaturthi Dates When Is Ganeshotsav Starting
२०२४ मध्ये गणपती बाप्पा कधी येणार? तारीख लक्षात ठेवा; मुंबईत लागले बाप्पाच्या आगमनाचे बोर्ड, VIDEO व्हायरल
vaishakh amavasya 2024
Vaishakh Amavasya 2024 : वैशाख अमावस्येच्या दिवशी शुभ संयोग, ‘या’ पाच राशींवर होणार देवी लक्ष्‍मीची कृपा
Loksatta samorchya bakavarun political situation Election Govt voting
समोरच्या बाकावरून: परिवर्तनवादी विरुद्ध ‘जैसे थे’वादी!
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…
Jill Viner the first female driver
कोणत्या वर्षी महिलांनी प्रवासी बसचालक क्षेत्रात पाऊल ठेवले? कोण होती जिल विनर जाणून घ्या….
30 year of non white government in South Africa
विश्लेषण : दक्षिण आफ्रिकेत बिगर-श्वेतवर्णीय सरकारची ३० वर्षे … काय बरोबर, काय चुकले?
Budh Mahadasha
Budh Mahadasha : १७ वर्षे पैशांमध्ये लोळतात हे लोक, कुंडलीतील बुधाची महादशा बनवते त्यांना श्रीमंत

साक्षीला सासरची मंडळी, शिवाय ऑफिस आणि घर कसं सांभाळतेस, असा प्रश्न मी विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘अगं घरात खरं तर कशाची कमी नाहीये. सासू-सासरे आणि आम्ही नवरा-बायको असं चौकोनी कुटुंब आहे. सासरे रिटायर्ड झालेत आणि सासू आधीपासून गृहीणी आहेत. लग्न झालं तेव्हा मी नोकरी सोडलेली, त्यामुळे घरातलं सगळं सांभाळून घ्यायचे. स्वयंपाक, इतर कामं आणि पाहुणे आलेत, तर तेही व्हायचं. सासरी रुळल्यावर नोकरी पुन्हा सुरू केली. नोकरी सुरू केली आणि तारेवरची कसरतही सुरू झाली. मी म्हटलं काय झालं नेमकं, तर साक्षी बोलू लागली. म्हणे ऑफिस घरापासून लांब आहे, त्यामुळे सकाळी लवकर आवरून निघावं लागायचं, त्यात चौघांचा नाश्ता, स्वयंपाक आणि इतर कामंही करून जावं लागायचं, काही दिवस केलं मॅनेज, पण नंतर खूप दगदग होऊ लागली. त्यामुळे नवऱ्याला म्हटलं की आपण घरकामासाठी बाई ठेवू. नवऱ्याने होकार दिला आणि घरात बाईचं येणं सुरू झालं. दोन आठवडे नीट होतं सगळं पण नंतर मात्र सासूच्या कुरबुरी सुरू झाल्या.

मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…

मी रोज घरी आले की ती बाई कशी नीट काम करत नाही, हे मला सांगायच्या. मीही तिचं काम पाहिलं होतं, त्यामुळे सासूचं म्हणणं पटत नव्हतं, पण नंतर मात्र सासूने या गोष्टी नवऱ्याला सांगायला सुरुवात केली. मग मला त्यांच्या कारणावर शंका आली. तर, एकेदिवशी त्यांना विचारलं की नेमका प्रॉब्लेम काय आहे, तर त्या म्हणाल्या की घरात सून असूनही कामाला बाई ठेवली आहे, असं लोक मला बोलतात. त्यांचं हे वाक्य ऐकून मी स्तब्ध झाले.

…तर काळजी नसावी!

खरं तर आम्ही नवरा-बायको घरकामासाठी बाई ठेवणं अफॉर्ड करू शकतो, इतकं कमावतो. त्यामुळे पैसे हेही कारण नव्हतं, फक्त लोक बोलतात, म्हणून त्यांना सगळी कामं मीच करावी असं अपेक्षित होतं. त्यांना आम्ही दोघांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यांच्या हट्टापुढे माघार घ्यावी लागली आणि बाईला कामावरून काढलं. आता मला रोज घरातली कामं आवरून ऑफिसला जावं लागतं. सासूने मला कधीतरी मदत करणं तर बाजूलाच, मदतनीस होती, तीही काढून घेतली.’

साक्षीने जे सांगितलं ते ऐकून मलाच वाईट वाटलं. आपण २१व्या शतकात आहोत, समाज पुढारला आहे, महिलाही आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, असे डायलॉग दिवसभरात एकदा तरी कानावर पडतातच. पण, एवढे बदल झाले असले तरी घरात आल्यावर महिलांना काम करावच लागतं. खरं तर महिलांनी ती करू नयेत, असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण ती कमवत असेल आणि घरकामासाठी बाई ठेवणं तिला परवडत असेल तर त्यात लोक काय म्हणतील, या कारणाने तिची परवड करणं चुकीचंच आहे, असं बोलत मी साक्षीला समजावलं, तितक्यात टीव्हीवर गाणं लागलं होतं, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है केहना…!