शाळेला सुट्ट्या लागलेल्या म्हणून आनंदी तिच्या मामाच्या गावाला गेली होती. मामाच्या मुलांबरोबर खेळणं, फिरणं सुरू होतंच. त्याचप्रमाणे दोन दिवस मस्त पाहुणचार झाला. खायला-प्यायलाही वेगवेगळे पदार्थ मिळाले, पण त्या दिवशी रात्री १२ वाजता अचानक आनंदीची दाढ फार दुखू लागली. काही तरी वेगळं खाण्यात आलं होतं. घरातले सगळे चिंतेत पडले. आनंदी म्हणजे शहरात राहणारी जणू सुकुमार राजकुमारीच. तिला असं रडताना पाहून कोणालाही काय करावं सुचेना. मामाला आजीची आठवण आली. घरी- गावी कोणाला असं काही झालं की आजी लगेच काही तरी घरगुती औषध सांगून बरे करायची. कधी कोणाला दवाखान्यातही जावं लागत नसे, मात्र आता आजीच राहिली नव्हती. त्यामुळे मामाला काय करावं काही कळत नव्हतं. तिला एवढ्या रात्री काय औषध द्यावे या विवंचनेत मामा अडकला.

आनंदीच्या वेदना वाढू लागल्या तसा रडण्यातला जोरही. त्याला माझी आठवण झाली आणि लगेच त्याने फोन लावला. काही तरी घरगुती औषध सांगा म्हणाला. कारण त्याच्या घराजवळ कुठेच औषधांचं दुकान अथवा दवाखाना नव्हता. आणि गावाकडे एवढ्या रात्री काही मिळणेही अवघड होते. मी त्याला आनंदीच्या दुखणाऱ्या दाढेत थोडी कापराची पूड आणि मोठ्या मिठाचा खडा १० मिनिटं धरून ठेवायला सांगितला आणि काय गंमत, लगेचच आनंदीची दाढ दुखायची राहिली. तिला शांत झोपही लागली. ते सांगायला तसा मामाचा मला फोन आला. गोष्ट छोटी असली तरी फार त्रासदायक होती. त्यावर तातडीने उपाय गरजेचा होता.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

हेही वाचा… चॉइस तर आपलाच: दर वेळी नकार का येतो?

दाढदुखी ही लहान मुलांमध्ये अशी अचानक काही तरी गोड पदार्थ खाल्ले, ते दातात अडकून बसले की रात्री दातातील कृमी त्यांचे कोरण्याचे काम सुरू करतात त्या वेळी वाढायला लागते.

मीठ हे आयुर्वेदातील उत्तम कृमिघ्न औषध आहे आणि कापूर हा श्रेष्ठ कृमिघ्न व वेदनास्थापक सांगितला आहे. वेदनास्थापक म्हणजे तत्काळ शूल, वेदना कमी करणारा. यामुळे आनंदीची दाढदुखी लगेच थांबली. असो. अशीच गंमत आपल्या बाबतीतही नेहमी होत असते. पण अगदी आपल्या जवळ असणारे, सहज करता येणारे, घरच्या घरी अगदी मसाल्याच्या डब्यातदेखील एक आयुर्वेदिक दवाखाना लपला आहे हे आपण जणू आजी गेल्यामुळे विसरूनच गेलो आहोत.

आपल्या या काही जुन्या प्रथा, परंपरा… घरगुती औषधींचा खूप मोठा वारसा आहे. त्याचा वापरही व्हायला हवाच.

harishpatankar@yahoo.co.in