यूपीएससी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे काम नाही, दरवर्षी हजारो उमेदवार या परीक्षेला बसतात. पण, त्यापैकी काही मोजकेच उमेदवार ही परीक्षा पास होतात. अनेक जण तर कठीण परिस्थितीचा सामना करत अभ्यास करतात व आपलं आयएएस, आयपीएस बनण्याचे स्वप्न पूर्ण करतात. आज आपण अशाच एका महिला आयएएस अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढत अभ्यास केला व आयएएस बनल्या.

आयएएस अधिकारी अंकिता चौधरी यांचा प्रवास यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे. अंकिता चौधरी या मुळच्या हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अंकिता यांनी इंडस पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी पूर्ण केली. ग्रॅज्युएशनच्या काळातच त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. आयआयटी दिल्लीतून पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
Moscow concert hall attack suspects confess
मॉस्को हल्ल्याप्रकरणी चौघांचा कबुलीजबाब
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब

हेही वाचा- कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास

अंकिता यांचे कुटुंब अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय आहे. अंकिता यांचे वडील साखर कारखान्यात लेखापाल आहेत आणि आई गृहिणी होती. अंकिता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांना स्वतंत्र आणि स्वावलंबी राहायला आवडते.

हेही वाचा- परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास

अंकिता यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्या अपयशी झाल्या. अंकिता यांनी पुन्हा एकदा परीक्षेस बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच काळात त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर अंकिता पूर्ण कोलमडून गेल्या होत्या, त्या एकट्या पडल्या होत्या. मात्र, वडिलांनी अंकिताला प्रोत्साहन दिले व पुन्हा एकदा परीक्षेस बसण्याचा सल्ला दिला. २०१८ साली अंकितानी पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा दिली. मेहनतीच्या जोरावर त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचा संपूर्ण भारतात १४ वा क्रमांक आला होता.