scorecardresearch

Premium

‘हे’ आहेत बॉलीवूडमधील महिला प्रधान चित्रपट; लैंगिक शिक्षणापासून महिलांच्या आयुष्यातील अडचणींवर भाष्य करणाऱ्या कथा

२०२३ वर्षात बॉलीवूडमध्ये अनेक महिला क्रेंद्रीत चित्रपट बनले आहेत. जाणून घेऊया अशा चित्रपटाबाबत

womanhood Bollywood Movies Of 2023
बॉलीवूडमधील महिला केंद्रीत चित्रपट

एक काळ असा होता की चित्रपटांमध्ये फक्त अभिनेत्यांचाच बोलबाला होता. चित्रपटातील अभिनेत्रीला अभिनेत्यापेक्षा कमी किंमत मिळायची. त्याकाळी पुरुषप्रधान चित्रपट बनवायची संख्याही अधिक होती. मात्र, आता बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यापेक्षा जास्त महत्व मिळत आहे. २०२३ मध्ये बॉलीवूडमध्ये महिला प्रधान चित्रपट जास्त निर्मिती झाली. या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही महिला प्रधान चित्रपटांबाबात…

१ ‘गंगुबाई काठियावाडी’

आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट चांगलाच गाजला. २५ फेब्रुवारी २०२३ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबदरस्त कमाई केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
junaid-khan-aamir-khan
‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसह आमिरचा मुलगा जुनैद खान करणार रोमान्स; चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

हेही वाचा- एकीकडे पतीचा मृतदेह दुसरीकडे पोस्टमॉर्टम, २२ हजार मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या मंजू देवीची कहाणी

२ ‘छत्रीवाली’

हा चित्रपट लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधकांवर आधारित होता. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगने सानिया नावाचे पात्र साकारले होते. सानिया कंडोमसाठी फॉर्म्युला डिझाइन करत असते. ती तिच्या बॉसला उत्पादने अधिक चांगली आणि प्रभावी बनवण्यासाठी मदत करताना दाखवण्यात आली आहे. लैंगिक शिक्षण आणि सुरक्षित सेक्सचे महत्त्व सांगणाऱ्या या चित्रपटात रकुल प्रीत सिंग व्यतिरिक्त सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली अहलुवालिया, राजेश तैलंग, प्राची शाह पंड्या, राकेश बेदी आणि रिवा अरोरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

३ ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीने मिसेस चॅटर्जीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट एका आईच्या संघर्षाची कथा आहे जिने बाल संरक्षणाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलून धरला होता.

हेही वाचा- नीना गुप्तांनी फालतू म्हटलेल्या फेमिनिझमचा खरा अर्थ काय? स्त्रीवादी भूमिका स्वीकारणं पुरुषद्वेषी का ठरतंय?

४ ‘तेजस’

कंगना राणौतचा चित्रपट ‘तेजस’चीही चांगलीच चर्चा रंगली होती. हवाई दलाचे पायलट तेजस गिल यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात कंगनाने साकारलेल्या भूमिकेच मोठं कौतुकही करण्यात आलं होतं. सर्वेश मेवाडा दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता.

५ ‘लस्ट स्टोरी २’

‘लस्ट स्टोरी २’ चित्रपटात चार कथा दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट सेक्स आणि लस्टवर भाष्य करतो. या चित्रपटात तमन्ना भाटीया, विजय वर्मा, अनुष्का कौशिक, नीना गुप्ता, कोंकणा सेन, काजोल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लैंगिक सुसंगतता, लैंगिक गरजा आणि लैंगिक हिंसा यासारखे मुद्दे समाजाला सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. ज्या विषयांवर कधीच उघडपणे चर्चा होत नाही अशा विषयांवर हा चित्रपट भाष्य करतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tejas gangubai chtriwali womanhood bollywood movies of 2023 dpj

First published on: 04-12-2023 at 19:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×