Postmortem woman worker: मृतदेहाचे नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र बिहारमधील ही महिला २४ तास मृतदेहांमध्ये असते. नाव आहे मंजू देवी. मंजू देवी यांनी आतापर्यंत २२ हजार मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले आहे. अपघातात किंवा इतर दुर्घटनेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जाते. या प्रक्रियेत शरीराची चीरफाड करून अंतर्गत अवयवांचीही तपासणी केली जाते. यावरून या व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाल्याचे समजते.

मात्र याच मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करणारे लोक हे जिंवत माणसं असतात. ते हे काम कसं करत असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का. हे एक दोन दिवसाचं काम नाही तर रोज वेगवेगळ्या मृतदेहांचं पोस्टमॉर्टम या लोकांना करावं लागतं.दरम्यान आतापर्यंत २२ हजार मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या मंजू देवीची कहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Three arrested for possessing 17 crores worth of smuggled gold Mumbai news
तस्करीतील १७ कोटींचे सोने बाळगणाऱ्या तिघांना अटक; दोन महिलांचा समावेश
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Water every two days at Ovecamp in SmartCity Kharghar
स्मार्टसिटी खारघरमधील ओवेकॅम्पात दोन दिवसाआड पाणी
Two smugglers from Sabe village who were selling ganja on Nehru road in Dombivli arrested
डोंबिवलीत नेहरू रस्त्यावर गांजा विक्री करणारे साबे गावातील दोन तस्कर अटकेत
Girl brutally beaten for mobile charger in gadchiroli
गडचिरोली : मोबाईल चार्जरसाठी युवतीला बेदम मारहाण; संतापाची लाट…
mystery of suicide of the two seekers grew search operation was carried out and bodies were recovered from valley
दोघा साधकांच्या आत्महत्येचे गूढ वाढले; शोध मोहीम राबवून दरीतून मृतदेह काढले
Mephedrone worth six and a half lakhs seized from a drug dealer
अमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराइताकडून साडेसहा लाखांचे मेफेड्रोन जप्त, रविवार पेठेत कारवाई
Pune, pistols, Shankarsheth road, pistols seized,
पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना शंकरशेठ रस्त्यावर पकडले, सराइतांकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

एकीकडे पतीचा मृतदेह दुसरीकडे हॉस्पीटलमधला मृतदेह

बिहारसारख्या राज्यातून आलेल्या मंजू देवी यांची कहाणी अनेक महिलांसाठी उदाहरण आहे. मंजू देवी यांनी सांगितले की, आम्ही २००० सालापासून पोस्टमार्टम करत आहोत. पण यादरम्यान माझ्या आयुष्यात असा एक क्षण आला जो मी कधीही विसरू शकत नाही. मला तो दिवस आठवला तर आजही रडू येते. कारण २००१ साली माझ्या पतीचा मृत्यू झाला होता आणि त्याचवेळी माझ्यासमोर एक अपघाताची केस आली. एका बाजूला माझ्या नवऱ्याचा मृतदेह घरात पडला होता, तर दुसरीकडे दवाखान्यात मृतदेह पडलेला होता. त्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी मला हॉस्पिटलमधून फोन आला. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितलं. त्यानंतर ते काम करुन मी पतीच्या अत्यंसंस्कार केले, असं त्या सांगतात. @TheLallantop ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

हेही वाचा >> पाकिस्तानच्या ९० हजार सैन्याला नमवणाऱ्या सॅम माणेकशा यांच्या तीन पाठिराख्या; जाणून घ्या कामगिरी

आम्हाला आईचा अभिमान

यादरम्यान मंजू यांनी त्यांच्या पाच मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचा एक मुलगा यशस्वी व्यावसायिक आहे तर इतर उच्च शिक्षण घेत आहेत. ‘आईनं आमच्यासाठी खूप त्रास सहन केला आहे. आम्हाला तिचा अभिमान आहे’ असं मुली आणि मुलगे सांगतात.