नितीन मुजुमदार

२०१७ मध्ये भारताने १७ वर्षांखालील मुलांची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा घेतली होती. त्यानंतर आता ५ वर्षांनी मुलींची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सध्या आपल्या देशात सुरू आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. मात्र कमी वयातच चमक दाखवणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला फूटबॉल खेळाडूंसारख्या खेळाडू आपल्याकडे घडायला ‘लॉंग टर्म प्लॅंनिंग’ लागणार आहे.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

हेही वाचा >>>का रे अबोला?

सध्या भारतात सुरू असलेली १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. ३० ऑक्टोबर रोजी कोलंबिया आणि स्पेन यांच्यामध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने मिआ हॅम या अमेरिकेच्या दोन ऑलिम्पिक व दोन विश्वचषक सुवर्णपदकांच्या मानकरी ठरलेल्या सर्वकालीन महान स्त्री फुटबॉलपटूचे अवतरण उद्धृत करावेसे वाटते, ती म्हणाली होती, “मेनी पीपल से, आय ऍम द बेस्ट सॉकर प्लेअर इन द वर्ल्ड. आय डोन्ट थिंक सो, अँड बीकॉझ ऑफ दॅट, आय जस्ट माईट बी!” आताच्या आपल्याकडच्या या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक १७ वर्षांखालील मुलीने फुटबॉल खेळताना अशी मनोवृत्ती बाळगायला हवी, महिला फुटबॉलमधील उद्याच्या ‘ऑल टाइम ग्रेट्स’ या मुलींमधूनच खेळताना दिसणार आहेत.

हेही वाचा >>>आकर्षक ‘अंडरआर्म्स’साठी चक्क मेकअप!

भारतात खेळली जात असलेली ही १७ वर्षांखालील मुलींची ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा एकूण ६ खंडांतील १६ देशांच्या संघांमध्ये खेळली जात आहे. वास्तविक ही स्पर्धा भारतामध्ये २०२० सालीच आयोजित होणार होती, परंतु कोविडच्या विश्वव्यापी साथीमुळे तिला तब्बल २ वर्षे ११ महिने ९ दिवस एवढा उशीर झाला! भारतात ही स्पर्धा कलिंगा स्टेडियम (भुवनेश्वर), जवाहरलाल नेहरू स्टेडियम (मडगाव ,गोवा) व डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे खेळली गेली. ३० ऑक्टोबर रोजी कोलंबिया व स्पेन यांच्यामध्ये अंतिम सामना होणार आहे. उत्तर कोरियाने ही स्पर्धा सर्वाधिक, म्हणजे दोन वेळा जिंकली आहे (२००८ व २०१६).

हेही वाचा >>>अक्षता मूर्ती आहेत तरी कोण?

या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडला असेल तर कोलंबियाच्या लिंडा कैसेदो या १७ वर्षीय मुलीचा. तिने आपले व्यावसायिक फुटबॉल पदार्पण वयाच्या चौदाव्या वर्षी केले आणि तिचा नंतरच्या तीन वर्षांतील प्रवास एवढा विस्मयजनक आहे, की ती आज कोलंबियाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघाचीच नव्हे, तर वीस वर्षांखालील तसेच वरिष्ठ महिला फुटबॉल संघाची आधारस्तंभ झाली आहे! जुलैमध्ये ‘कोपा अमेरिका फेमेनिना स्पर्धे’त कोलंबियाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात तिचा मोठा वाटा होता. याच स्पर्धेत तिला ‘प्लेअर ऑफ दी टूर्नामेंट’ हा मान ‘गोल्डन बूट’सह मिळाला. काली,कोलंबिया येथे जन्म झालेली लिंडा कैसेदो सुरुवातीला चक्क तिच्या परिसरातील मुलांच्या फुटबॉल संघाकडून खेळत असे. कारण काय, तर ती राहात असलेल्या परिसरात मुलींचा फुटबॉल संघच नव्हता. या स्पर्धेत तिने चीनविरुद्ध नोंदवलेला एक गोल फुटबॉल समीक्षकांची दाद मिळवून गेला. चीनविरुद्ध मिडफील्डमध्ये तिच्या दिशेने रोरावत आलेला फूटबॉल तिने ज्या सफाईने थांबवून एकाच किक मध्ये तीन डिफेंडर्स व गोलकीपर याना चकवून गोल नोंदवला तो क्षण अविस्मरणीय असाच होता!

हेही वाचा >>>महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे

या स्पर्धेत अमेरिकेच्या फुटबॉल संघाकडून खेळणारी मिआ भूता ही भारतीय वंशाची फुटबॉलपटूदेखील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. तिचे वडील मूळचे गुजरातमधील असून ते वयाच्या सोळाव्या वर्षी अमेरिकेत आले. तिचे आजी-आजोबा आजही भारतात राहातात. तीने अमेरिकेतील पीटसबर्ग येथून प्राथमिक शिक्षण घेतले व नंतर पुढील शिक्षणासाठी स्टॅनफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात तिने एक गोलही नोंदविला, जो तिने त्याच दिवशी यशस्वी ‘बायपास’ सर्जरी झालेल्या आपल्या आजोबांना अर्पण केला. “मी रोज आदल्या दिवशी असलेल्या खेळाडूपेक्षा उत्तम खेळाडू झाले आहे का, असा प्रश्न स्वतः ला विचारते,” हे ट्विटरवर उद्धृत केलेले तिचे वाक्य प्रत्येक उगवत्या फुटबॉलपटूने ‘फॉलो’ करावे असेच आहे.

हेही वाचा >>>Indian Cricket: दिवाळी संपताच भारतीय महिला संघाला BCCI कडून मोठं गिफ्ट; जय शाह यांनी केली घोषणा

भारतात होत असलेल्या या स्पर्धेतून भारतीय फुटबॉल संघाला काय मिळाले? अगदी स्पष्ट सांगायचं तर केवळ यजमान आहोत म्हणून स्पर्धेत खेळलेल्या भारताकडून या स्पर्धेत फार अपेक्षाही नव्हत्या. भारतीय संघाची कामगिरी त्या अपेक्षांनुरूपच झाली. तीन सामन्यांत भारतीय संघाने एकही विजय तर मिळवला नाहीच, पण एक गोलसुद्धा भारतीय संघ नोंदवू शकला नाही. अमेरिकेविरुद्ध ०/८, मोरोक्को विरुद्ध 0/३ आणि ब्राझीलविरुद्ध ०/५ असे आपले रिपोर्ट कार्ड. भारताचे स्वीडिश प्रशिक्षक थॉमस डेनर्बी यांच्या मते “एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी ५-६ महिन्यांची तयारी पुरेशी नाही. येथे लॉंग टर्म प्लॅंनिंगच पाहिजे.” त्यांच्या म्हणण्यात खूप तथ्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने फेब्रुवारीच्या अखेरीस सरावास प्रारंभ केला व रनिंग, फिटनेस, टेक्निकल आदींची सुमारे २७० सेशन्स पूर्ण केली. भारताच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ खूप दबावाखाली खेळताना दिसला आणि तो दबाव गोल फलकावरही दिसला. नंतर भारतीय संघ तुलनात्मकदृष्ट्या कमी दबावाखाली होता. मात्र प्रतिस्पर्धी संघातील खूप खेळाडूंना वयाच्या १४-१५ व्या वर्षांपासून आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा भरपूर अनुभव होता. नेमका हा मोठा फरक भारत व इतर संघांमध्ये स्पष्टपणे दिसला. २०१७ मध्ये भारताने १७ वर्षांखालील मुलांची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा घेतली होती, त्यानंतर ५ वर्षांनी मुलींची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा घेतली. हे सारे आयोजन व उपक्रम स्तुत्यच. पण या सगळ्याला ‘लॉंग टर्म प्लॅंनिंग’ची जोड दिसत नाही. १७ वर्षांखालील मुले व मुलींना कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव व प्रशिक्षण यांची जोड मिळालीच पाहिजे, नाहीतर फक्त आयोजन करून फारसे हाती काही लागणार नाही.

भारतात क्रिकेट वगळता आणि अगदी अलीकडे बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकीसारखे थोडे अपवाद सोडले, तर इतर खेळांना आंतरराष्ट्रीय ‘स्टँडिंग’ नाही म्हणून पुरस्कर्ते नाहीत आणि पुरस्कर्ते नाहीत म्हणून लोकाश्रय कमी. अशा दुष्टचक्रात बरेचसे खेळ सापडले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत परिस्थितीत नक्कीच सुधारणा झाली आहे.ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॉकी वगळता इतर खेळांतसुद्धा पदके मिळू लागली आहेत, मात्र अजून मोठा पल्ला बाकी आहे, हेच या मुलींच्या फूलबॉल स्पर्धेच्या निमित्ताने अधोरेखित होते.

nitinsmujumdar@gmail.com