Tribal girl from Tamil Nadu’s Tiruchirappalli scores 73.8% in JEE Mains : मेहनत करणाऱ्याची तयारी असेल, तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. त्यात आई -वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत अनेक मुलं आपल्या स्वप्नांना गवसणी घालतात. अशाच प्रकारे मोजमजुरी करून गुजराण करणाऱ्या आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या एका लेकीने कष्टाचे चीज केले आहे. तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील आदिवासी समाजातील १८ वर्षीय रोहिणी हिने पहिल्याच प्रयत्नात भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या जेईईमध्ये चांगले गुण मिळवून इतिहास रचला आहे.

अहवालानुसार, रोहिणीने परीक्षेत ७३.८ टक्के गुण मिळवीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्रिची येथे प्रवेश मिळविला आहे. या यशाने रोहिणी स्वत: खूप खूश झाली आहे आणि तिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

“जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण होऊ झाले याचे श्रेय शाळेतील शिक्षकांना” रोहिणीची प्रतिक्रिया

रोहिणीने स्वत:च्या यशाबद्दल एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, “मी आदिवासी समाजातील आणि आदिवासी सरकारी शाळेतून शिकलेली विद्यार्थिनी आहे. मी जेईई परीक्षेमध्ये ७३.८ टक्के गुण मिळवून NIT त्रिची मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यात मी बी.टेक. इन केमिकल इंजिनियरिंग कोर्सची निवड केली आहे. माझे सर्व शुल्क भरण्यासाठी तमिळनाडू राज्य सरकार पुढे सरसावले आहे. मला मदत केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते. आज जर मी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण होऊ झाले याचे श्रेय माझ्या शाळेतील शिक्षकांना आहे. माझ्या चांगल्या कामगिरीमागे माझ्या शिक्षकांची प्रेरणा आहे.

रोहिणी आई-वडिलांसह करायची रोजंदारीवर काम (JEE Main Success Story)

रोहिणीचे यश विशेष आहे. कारण- ती प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आली आहे. तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात आणि तिचे घर चिन्ना इलुपूर गावात आहे. रोहिणीच्या आयुष्यात अनेक संकटे आली; पण तिने आयुष्यात प्रयत्न करणे कधीच सोडले नाही.

रोजच्या संघर्षाबद्दल बोलताना रोहिणीने सांगितले की, माझे आई-वडील रोजंदारीवर काम करतात आणि प्रवेश परीक्षेची तयारी करताना मीसुद्धा रोजंदारीवर कामगार म्हणून काम केले. मी चांगला अभ्यास केल्यामुळे मला त्रिची NIT मध्ये जागा मिळाली.

More Success stories read : मित्रांच्या सोबतीने बदललं आयुष्य! बालपणी शाळेची फी भरायलाही नव्हता पैसा, आज ५५ हजार कोटींचे मालक; कोण आहेत जयंती कनानी?

एएनआयने रोहिणीच्या संघर्षाचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यात ती घरात स्वयंपाक आणि बागकाम यांसारखी दैनंदिन कामे करताना दिसते. शेवटी ती तिचे प्रवेशपत्रदेखील दाखवते. रोहिणीची ही संघर्षमय कथा आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे तिने मिळविलेल्या या यशानंतर अनेक जण आता तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहवालानुसार, NIT त्रिचीचे सरासरी वेतन पॅकेज १० ते १५ लाखांच्या दरम्यान आहे. भारत सरकारच्या सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी संस्था रँकिंग (NIRF) मध्ये या संस्थेला नववा क्रमांक मिळाला आहे.