मंगला जोगळेकर

विस्मरणाचा आजार हा वाढत्या वयाबरोबर येणार्‍या प्रश्नांपैकीच एक प्रश्न आहे असा अनेकांचा चुकीचा समज असतो. गंभीर विस्मरण हे वृद्धत्वाचे लक्षण नाही. म्हणजे म्हातारपणी प्रत्येकाचे केस पांढरे होतात, त्वचा सुरकुतते, तसे प्रत्येक ज्येष्ठामध्ये गंभीर विस्मरण नसते. अलिकडे वयाच्या साधारण पंचाहत्तर वर्षापर्यंत किंवा त्यापुढेही व्यक्ती सक्षम असतात, निवृत्तीनंतर नवनवीन जबाबदार्‍या घेऊन त्या कार्यक्षमतेने पार पाडतानाही दिसतात. त्यामुळे वृद्धत्वाची व्याख्या करताना पंचाहत्तरपर्यंत तरुण-वृद्ध असे आता म्हटले जाते! ‘डिमेन्शिया’ (म्हणजे गंभीर स्वरूपाचे विस्मरण आणि त्याच्याशी संबंधित इतर लक्षणे) हे वृद्धापकाळातील दुखण्यांपैकी एक दुखणे नव्हे हे पक्के लक्षात घ्यायला हवे.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : मैत्रीच्या पुढची पायरी कोणती ?

सर्वसाधारण विस्मरण आणि गांभीर्याकडे वाटचाल करणारे विस्मरण यातील फरक न कळल्यामुळेही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. खेड्यापाड्यात तर जाऊद्या, पण शहरी, सुशिक्षित व्यक्तींमध्येही या आजाराच्या माहितीचा अभाव दिसून येतो. निवृत्तीमुळे, व्यक्तीच्या अंगावरच्या जबाबदार्‍या कमी झाल्यामुळे आजाराची लक्षणे समजायला वेळ लागू शकतो. कधी कधी एकंदरच वृद्धांच्या प्रश्नांना ‘वयपरत्वे असे होणारच’ म्ह्णून दुर्लक्षिले जाते. त्यात स्त्रिया आपले प्रश्न इतरांना सांगत नाहीत. अशा विविध कारणांमुळे लक्षणे आधी समजत नाहीत आणि त्यामुळे वेळीच उपचार चालू होत नाहीत.

आणखी वाचा : काय आहे स्मृती मानधनाचा डाएट प्लान?

गंभीर विस्मरणाची लक्षणे एकाएकी वाढत नसतात. असे घडले, तर औषधांचा परिणाम किंवा दुसर्‍या कुठल्या आजारपणाचा तो परिणाम असावा असे म्हणायला हरकत नाही. गंभीर विस्मरणाची सुरुवात आपण काही उदाहरणांवरुन समजून घेऊ या.

  • कावेरीताईंचे सारखेच काहीतरी हरवते असे दिसून येत होते. डोक्यावरून आंघोळ करायला जाताना त्यांनी त्यांचे कानातले कागदात गुंडाळून ठेवले होते, पण कुठे ते त्यांना आठवेना. कचर्‍यात गेले की काय, अशी शंका आल्याने बघितले, तर खरेच ते कचर्‍याच्या डब्यात सापडले.
  • सुरेखाताई रिक्षा स्टॅंडवर गेल्या, रिक्षात बसल्या, पण कुठे जायचे ते त्यांना सांगता येईना. मग त्या तशाच थांबून राहिल्या. पाठीमागून सून घरातून बाहेर आली आणि तिने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला.
  • ज्येष्ठ नागरिक संघात व्याख्यानाला जाताना नेहेमीच जयाताई आणि शुभाताई एकत्र जातात पण अलिकडे जयाताईंचा कार्यक्रमाचा दिवस लक्षात ठेवण्यात गोंधळ उडतो. मग त्या शुभाताईंना सकाळी फोन करुन सारख्या विचारत राहातात.
  • बॅंकेची कामे ही जयंतरावांची जबाबदारी. पण अलिकडे ते कंटाळा करताना दिसत होते. कधी नातवाला सांग, नाहीतर मुलाकडून करुन घे, असे चालले होते. बायकोने ‘तुम्हीच बॅंकेत जा’ सांगितल्यावर ते जायला लागले खरे, पण काही ना काही चुका होऊ लागल्या, त्यामुळे एक दिवस बॅंकेतून घरी फोन आला होता.

आणखी वाचा : फोर मोअर शॉट्स – तिसऱ्या पर्वात महिलांची लैंगिकता, सेक्स आणि बरंच काही…

  • सुरेशभाई सोसायटीचे सेक्रेटरी. त्यांच्या कामामुळे सोसायटीत त्यांना खूप मान मिळायचा. पण अलिकडे त्यांचे अनेक लोकांशी खटके उडताना दिसत होते. त्यांच्या कामात काही चुका व्हायला लागल्या होत्या. त्यांना काही सांगायला जावे, तर ते लगेच हमरीतुमरीवर येताना दिसत होते.
  • रेणूताईंना घरात आपल्या विणकामाच्या सुया सापडेनात. काही दिवसांपूर्वी त्यांची भाची त्यांना भेटायला आली होती. त्यांनी तिला फोन केला आणि चक्क विचारले की, “तू माझ्या विणायच्या सुया घेऊन गेलीस का?” तिने ‘नाही’ म्हटल्यावरही त्यांनी तो विषय लावून धरला. ‘तिनेच सुया नेल्या’ या संशयाचे आरोपात रुपांतर झाले.
  • समेळ काका आणि काकूंना सिनेमाचे अती वेड. त्यांच्या आवडीच्या नटनट्यांचे सिनेमे ते अजिबात सोडत नाहीत. पण अलिकडे काकांना सिनेमामध्ये काही रसच उरलेला दिसत नव्हता.
  • सासवडे काकू गीता ग्रुपमध्ये गेले वर्षभर जात होत्या, परंतु त्यांना पाठांतर जमत नव्हते. क्लासमध्ये त्या काहीतरी भलतेच विषय काढायच्या. सभासदांना खासगी माहिती विचारायच्या. त्यांच्यामुळे क्लासच्या कामकाजावर परिणाम व्हायला लागला

आणखी वाचा : Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा

ही सर्व उदाहरणे देण्याचे कारण हे, की प्रत्येकामध्ये दिसणारी लक्षणे वेगळी असतात हे समजावे. हे अनुभव तुम्हाला येणार्‍या सर्वसाधारण विस्मरणाच्या अनुभवांपेक्षा वेगळे वाटतात ना?… या दोघांमधील फरक आणखी स्पष्ट करु या.
बॅंकेत जाऊन पेन्शन काढण्याचे काम केव्हा करायचे हे ठरलेले असते. मोबाईलचे बिल, दूधाचे बिल, वीजेचे बिल या सगळ्यांच्या आपापल्या तारखा असतात. ही बिले भरताना तुमची तारीख मागे-पुढे होईल, पण ते वेळेत भरले जाईल. परंतु विस्मरणाशी झगडणारी व्यक्ती ते वेळेवर करेलच असे नाही. किंबहुना आपल्याला बिले द्यायची आहेत, हेच त्या व्यक्तीच्या लक्षात राहाणे अवघड होऊ शकते. किंबहुना आपले विस्मरणाचे अनुभव त्यांच्या लक्षात राहाणार नाहीत.

आणखी वाचा : ती पुन्हा भेटली… पण या खेपेस वेगळ्या रूपात!

समजा तुमच्या लाडक्या भाचीचे लग्न ठरले आहे, तर तुम्ही ती तारीख बिलकुल विसरणार नाही. केळवण कधी करायचे, काय आहेर द्यायचा, सगळे तुमच्या मनात घोळत राहील. पण गंभीर विस्मरण झालेली व्यक्ती पुन्हा, पुन्हा लग्नाची तारीख विचारत राहील. पुन्हा, पुन्हा एकाच गोष्टीबद्द्ल बोलत राहाताना दिसेल.
याशिवाय रोजच्या जीवनात सतत काहीतरी अनुभव येतच राहातील. पत्ते खेळायला बसलात, तर डाव कसा लावायचा, बँकेच्या संदर्भात चेकवर सही कुठे करायची, तारीख कुठे टाकायची, पाहुण्यांसाठी चहा करताना आधण किती ठेवायचे, अशा स्वरुपाच्या गोष्टींमध्ये गोंधळ उडताना दिसू शकेल.

आणखी वाचा : : चांगुलपणाला कुठं नाव असतं?

वरील वर्णनावरुन आणि खाली दिलेल्या गंभीर विस्मरणाच्या लक्षणांवरुन सर्वसाधारण विस्मरण आणि त्याच्या पुढे काही पायर्‍या गेलेले गंभीर विस्मरण यातील फरक ओळखणे तुम्हाला सोपे जाईल.

गंभीर विस्मरण कसे ओळखावे?

• वेगाने वाढत जाणारे विस्मरण
• परिचयाची कामे करण्यात अडचणी
• रोजचे जीवन जगण्यात अडचणी
• नवीन माहिती लक्षात ठेवणे अवघड
• नवीन शिकणे अवघड
• तात्पुरत्या स्मरणशक्तीत घसरण
• भाषाज्ञानात उणीवा
• संभाषणाचे कौशल्य कमी
• स्थळकाळाचे भान कमी
• नियोजन करणे आव्हानात्मक
• सारासार विचारशक्तीत उतरण
• समाजात मिसळण्यास नाखुषी
• दृष्टिदोषात वाढ (म्हणजे वस्तूंमधील अंतर न समजणे, रंग न समजणे, इत्यादी)

आणखी वाचा : मासिक पाळीदरम्यान सेक्स? तर… हे नक्की वाचा

ही सर्वच लक्षणे जशीच्या तशी प्रत्येकात आढळून येतील असे नाही. व्यक्तीगणिक लक्षणांत, त्यांच्या तीव्रतेत फरक असू शकतो. परंतु आपल्या प्रिय व्यक्तीचे विस्मरण सर्वसाधारण आहे की गंभीर स्वरूपाकडे झुकते आहे, याची कल्पना यावरून येऊ शकेल. म्हणूनच विस्मृतीच्या आजाराचे निदान करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींच्या निरीक्षणाला फार महत्त्व असते.