अलीकडेच झालेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेवर आपल्या कर्तृत्त्वाने ठसा उमटवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघातील मराठमोळी स्मृती मानधना पुन्हा एकदा चर्चेत आली. बीसीसीआयने २०१८ साली सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून घोषित केलेली आणि त्याच वर्षी आयसीसीने रॅचेल हेहो फ्लिंट पुरस्काराने गौरवलेली स्मृती मानधना ही लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिलाही ठरली. २०२१- २२ च्या मोसमात शतकी खेळी करण्याबरोबरच स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमाशी बरोबरी करणारी अशीही एक ओळख तिने निर्माण केली. भारतीय महिला संघाची उपकर्णधार असलेल्या स्मृती मानधनाच्या फिटनेसविषयी, खेळाविषयी नेहमीच चर्चा होत असते. नवोदित महिला खेळाडूंना तिच्या दैनंदिन वेळापत्रकाबद्दल, खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल जाणून घेणं गरजेचं वाटतं. किंबहुना, अनेकांसाठी खेळाडूंच्या फिटनेसविषयीचं सुप्त आकर्षण असतं. त्यामुळे खेळांचे सामने झाल्यानंतर किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान खेळाडूंच्या मुलाखतींमधून याविषयीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केला जातो. पण फक्त क्रिडापटूच नव्हेत तर अनेक चतुरांनाही तिचा डाएट प्लान समजून घेण्यात स्वारस्य आहे.

आणखी वाचा : फोर मोअर शॉर्ट्स प्लीज – तिसऱ्या पर्वात महिलांची लैंगिकता, सेक्स आणि बरंच काही…

Fathers Day 2024 in Marathi
Fathers Day 2024 : “तुम्ही सोडून गेला आणि आम्हाला ‘बाप’ कळला” मुलीचं वडिलांना भावनिक पत्र
IAF first flying officer in the Punjab
केवळ २३ वर्षांची ‘आर्मिश असिजा’ बनली हवाई दलातील सर्वात तरुण महिला IAF अधिकारी! पाहा
doctor Rupa Yadav inspiring journey
‘बालवधू’ ते यशस्वी ‘डॉक्टर’! स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुपाला कशी मिळाली कुटुंबाची साथ, पाहा…
womans right to decide on abortion
गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार महिलेचाच!
Anamika B Rajeev,
अनामिका बी राजीव… समुद्रातून आकाशी यशस्वी झेप
Womens health How appropriate to take period pills
स्त्री आरोग्य : पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेणं कितपत योग्य?
Pravati Parida
वकिली ते थेट ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, कोण आहेत प्रवती परिदा?
Removing Girls Clothes Is Not Rape
“मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, स्वतः नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही तर..”, राजस्थान हायकोर्टाने निर्णयात सांगितले बलात्काराचे तीन टप्पे
plus size model sara Milliken
Sara Milliken : “सौंदर्य हे प्रत्येक आकारात, रंग-रूपात…” प्लस साईज मॉडेलचे ट्रोलर्सना चोख उत्तर!

कोणत्याही प्रकारच्या खेळासाठी फिटनेस अत्यावश्यकच असतो. फिटनेस राखण्यासाठी नियमित योग्य व्यायाम, शास्त्रशुद्ध सराव या बरोबरच संतुलित आहार याचीही सांगड घातली जाते. भारतीय महिला राष्ट्रीय संघातील पहिल्या फळीतील देखणी डावखुरी फलंदाज स्मृती मानधना आपल्या अनोख्या स्टाईल तसंच उत्तम फिटनेससाठी ओळखली जाते. खेळाच्या नियमित सरावामध्ये स्मृती कधीही खंड पडू देत नाही. सराव काटेकोरपणे करण्याकडे तिचा कायम कटाक्ष असतो.

आणखी वाचा : Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा

मारवाडी कुटुंबातून आलेल्या स्मृतीच्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थांबरोबरच अंडी आणि शाकाहारी जेवणाचाही समावेश असतो. खेळाडूंच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असणं आवश्यक असलं तरीदेखील मांसाहाराचा वासही तिला सहन होत नसल्याने ते ती वर्ज्य करते. अंड्यांच्याबाबतीत म्हणाल तर तेही तिने प्रशिक्षकांच्या सांगण्यावरूनच खायला सुरूवात केल्याचं ती सांगते.
घरचे ताजे अन्न अर्थात “माँ के हात का खाना” खाण्यावर तिचा जास्तीत जास्त भर असतो. खरं सांगायचं तर तिला बाकी कोणत्याही खाण्यापेक्षा हे घरचं जेवण तिला अधिक आवडतं. स्मृतीची आईदेखील आपल्या लाडक्या लेकीच्या खाण्याची कोणतीही आबाळ होऊ न देता तिला नेहमीच पौष्टिक खाणं मिळेल याची काळजी घेते.

आणखी वाचा : नातेसंबंध : मैत्री… लग्नापूर्वी आणि नंतरची

सुकामेव्यासह सोयायुक्त पदार्थदेखील ती आहारात घेते. इतकंच नाही तर “दिलसे शाकाहारी” असलेली स्मृती हिरव्यागार भाज्यांचा समावेश सलाडमध्ये कच्च्या स्वरूपात तसंच करीच्या रूपात करतेच करते. ताज्या आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या, फळे खाण्याला स्मृती प्राधान्य देते. अशा आखीवरेखीव चौरस आहाराची सवय आणि आवड असलेल्या कुणालाही एखाद दिवशी चीट डाएट करण्याची इच्छा होतेच. चीट करतानाही आपल्या आहारचौकटीला फारसा धक्का लागणार नाही, याचाही विचार स्मृती करते. ‘अस्सल सांगलीकर’ असलेल्या स्मृतीला मिठी भेळ खूपच आवडते.

आणखी वाचा : ती पुन्हा भेटली… पण या खेपेस वेगळ्या रूपात!

मैदानावरील खेळण्यातील सहजतेसाठी आहार कसा आणि कोणता घेतला जातो हे प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचं असतं. प्रत्यक्ष खेळाच्या मैदानावर सरावावेळी तसंच सामन्यांदरम्यान चपळाई आणि ताकदीची आवश्यकता असते. या गोष्टी योग्य आहाराशिवाय साध्य होत नाहीत. सर्वसाधारणपणे बरेचसे खेळाडू हे पोस्ट वर्कआऊट किंवा सरावानंतर प्रोटीन मिल्कशेक घेणे पसंत करतात. यामुळे शरीराची झीज भरून निघण्यासोबतच आवश्यक ती ऊर्जा मिळायला मदत होते. स्टॅमिना, चपळता, लवचिकता या गोष्टी फक्त खेळासाठीच नाही तर प्रत्येकाच्या जगण्यासाठी आज आवश्यक असल्याचंही स्मृती आवर्जून सांगते.