Asian Games 2023, India W vs Sri Lanka W: भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या विजयात १८ वर्षीय वेगवान गोलंदाजाने अंतिम फेरीत चार षटकांत सहा धावा देत तीन विकेट्स घेतल्या. यादरम्यान तिने एक मेडन ओव्हरही टाकली. मात्र, त्यात सर्वात खास बाब म्हणजे तिचे पहिलेच षटक, ज्यात तिने चार चेंडूत दोन विकेट्स घेत सामन्याचे चित्र पालटले. या वर्षाच्या सुरुवातीला तितासने भारतासाठी अंडर-१९ महिला टी२० विश्वचषकही जिंकला होता. त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ती सामनावीर ठरली होती. कोण आहे तितास साधू? जाणून घेऊया तिच्याबद्दल…

तितास साधूचे नाव पहिल्यांदा कधी चर्चेत आले?

२९ जानेवारी २०२३ ही तारीख कोण विसरू शकेल? त्या दिवशी, भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघाने महिला अंडर-१९ टी२० विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकली होती. कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारतीय महिला संघाचा हा पहिला विजय ठरला. अंतिम फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी झाला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ १७.१ षटकांत सर्वबाद ६८ धावांवर आटोपला. तितासने त्या सामन्यात चार षटकांत सहा धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या आणि ती भारताची सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. भारताने १४ षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. तितासला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी तीत खूप चर्चेत होती.

Irfan Pathan Picks 15 Man Squad
Team India : इरफान पठाणने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची केली निवड, हार्दिक पंड्यासमोर ठेवली ‘ही’ अट
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

सात महिन्यांनंतर महिलांच्या वरिष्ठ संघात पदार्पण

सुमारे सात महिन्यांनंतर, २४ सप्टेंबर रोजी, तितासला आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय वरिष्ठ महिला संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. एशियाडच्या उपांत्य फेरीत तिने आपला पदार्पण सामना थेट बांगलादेशविरुद्ध खेळला. यामध्ये तिने १० धावांत एक विकेट घेतली. अंतिम फेरीत कर्णधार हरमनप्रीतने तिच्यावर विश्वास ठेवला आणि तितासने कर्णधाराला निराश केले नाही. भारतीय संघाची धावसंख्या खूपच कमी होती. टीम इंडियाला केवळ ११७ धावा वाचवायच्या होत्या.

हेही वाचा: Gold Medal: भारतीय महिला क्रिकेट संघाने एशियन गेम्स मध्ये प्रथमच जिंकले सुवर्णपदक; सामन्यानंतर स्मृती म्हणाली, “राष्ट्रगीतावेळी…”

वाढदिवसापूर्वी देशाला दिलेली दिली सुवर्ण भेट

श्रीलंकेच्या डावातील तिसऱ्या षटकात तितास गोलंदाजीसाठी आली आणि तिने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेची सलामीवीर अनुष्का संजीवनीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर विश्मी गुणरत्ने बाद झाली. यानंतर तितासने श्रीलंकेची सर्वात विस्फोटक आणि अनुभवी फलंदाज, त्यांची कर्णधार चामारी अटापट्टू हिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या तीन विकेट्समुळे श्रीलंकन संघ बॅकफूटवर फेकला गेला आणि भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. फायनलमध्ये म्हणजे महत्त्वाच्या सामन्यात कामगिरी करण्याच्या तितासच्या क्षमतेमुळे भारत पुन्हा एकदा आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन बनला. आगामी काळात भारताची स्टार म्हणून तिचे वर्णन केले जात आहे. चार दिवसांनंतर आपला १९वा वाढदिवस साजरा करणारी युवा वेगवान गोलंदाज तितास साधूने अंतिम फेरीत चार षटकांत सहा धावा देत तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा: IND W vs SL W, Asian Games: लहरा दो…! भारतीय महिला संघाने रचला इतिहास, श्रीलंकेवर १९ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत जिंकले सुवर्णपदक

तित ही मूळची बंगालची आहे

तितास ही मूळची पश्चिम बंगालची रहिवासी आहे. तिचा जन्म सप्टेंबर २००४ मध्ये पश्चिम बंगालमधील चिनसुरा येथे झाला. तितचे वडील रणदीप साधू क्रिकेट अकादमी चालवायचे, पण त्यांना क्रिकेटमध्ये फारसा रस नव्हता. तितला लहानपणापासूनच पोहणे, धावणे आणि अॅथलेटिक्सची आवड होती. तिला फक्त क्रिकेट बघायला आवडायचं. तितचे वडील दोन वर्षांपासून अकादमी चालवत होते तोपर्यंत ती १३ वर्षांची झाली होती. एके दिवशी अकादमी काही कारणास्तव बंद असताना तितच्या वडिलांनी तिला गोलंदाजी करायला सांगितले. तितचा हा क्रिकेटचा पहिलाच दिवस होता. येथूनच तितला क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि तिने गोलंदाज होण्याचे ठरवले. तितने वयाच्या १३व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि वडिलांच्या अकादमीमध्ये प्रवेश केला. दहावीत गेल्यावर तिने फिटनेस चाचण्या दिल्या पण निवड झाली नाही. कोरोना महामारीनंतर तिने वरिष्ठ संघासाठी चाचण्या दिल्या आणि नेट गोलंदाज म्हणून बंगालच्या वरिष्ठ संघात तिची निवड झाली.

अंडर-१९ विश्वचषकात आश्चर्यकारक कामगिरी केली

वरिष्ठ महिला टी२० स्पर्धेत बंगालकडून तितासने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. ही स्पर्धा तिच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. तितासची कामगिरी पाहून तिला १९ वर्षांखालील महिला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अंडर-१९ विश्वचषकादरम्यान तितासने नऊ विकेट्स घेतल्या होत्या. आतापर्यंत तिने वरिष्ठ भारतीय संघासाठी दोन टी२० सामने खेळले असून चार विकेट्स घेतल्या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ती दुसऱ्या स्थानावर आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले.

झुलन गोस्वामी तितास साधूची आदर्श आहे

तितासचे वैशिष्टय़ म्हणजे नवीन आणि जुने असे दोन्ही चेंडूंने ती चांगली स्विंग गोलंदाजी करू शकते. तिच्याकडे फलंदाजांच्या दांड्या उडवण्याचे कौशल्य आहे. ती चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकते. बंगालची माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही तितासची आदर्श आहे. झुलन अनेक वर्षे भारतीय संघाकडून खेळली असून तितलाही दीर्घकाळ भारतीय संघाची सेवा करायची आहे. तितासला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!