सण म्हणजे बायकांचा पिट्ट्या… समीकरण स्वच्छ आहे. आणि इथे फक्त हिंदू नाही तर अन्य समाजातही थोड्याफार फरकानं हेच चित्र दिसतं. ईदची इफ्तारी करायला बायका दुपारपासून खपू लागतात. पहाटे उठून त्यांनी खाणं केलेलं असतंच. संध्याकाळसाठी पुन्हा सुरू… बहुतेक धर्मांत असंच चित्र असतं…

आणि खुद्द बायकाच याचं समर्थन करतात की, आम्हाला हे आवडतं… दुसऱ्याला जेवू घालण्यात आनंद असतो, तुम्हाला सर्व चुकीचं वाटतं इत्यादी इत्यादी…

गणपती, गौरीची धामधूम नुकतीच संपली आहे. सोशलमीडिया, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम सगळीकडे गणपती, गौरी, प्रसाद, मोदक, खाणे इत्यादीची चर्चा सुरू आहे. आणि या सर्वांत प्रकर्षानं जाणवलं काय? तर चुलीसमोर खपणाऱ्या बायका… अखंड कामात… मग शहर असो अथवा गाव खेडं. आमच्या घरात असा प्रसाद, आमच्या घरातील एकत्र जेवण, (यात बसून मस्त जेवणारे फक्त पुरुषच मात्र), आमची एकत्र कुटुंब पद्धती, संस्कृती यांबद्दल अभिमान बाळगणाऱ्या पोस्ट्स… सण म्हणजे बायकांचा पिट्ट्या… समीकरण स्वच्छ आहे. आणि इथे फक्त हिंदू नाही तर अन्य समाजातही थोड्याफार फरकानं हेच चित्र दिसतं. ईदची इफ्तारी करायला बायका दुपारपासून खपू लागतात. पहाटे उठून त्यांनी खाणं केलेलं असतंच. संध्याकाळसाठी पुन्हा सुरू… बहुतेक धर्मांत असंच चित्र असतं…

आणि खुद्द बायकाच याचं समर्थन करतात की, आम्हाला हे आवडतं… दुसऱ्याला जेवू घालण्यात आनंद असतो, तुम्हाला सर्व चुकीचं वाटतं इत्यादी इत्यादी…

काही ग्रुपवर सातत्यानं पोस्ट पडत होत्या की, एकटीनं इतका स्वयंपाक केला, इतकी माणसं येऊन गेली, अशी आरास केली. अमुक तमुक.

तरी यात मी गोळ्या घेऊन पाळी पुढं ढकलणं हा विषय घेत नाहीये. त्याचा एक स्वतंत्र लेख होईल.

हे दिवस संपले की श्राद्ध पक्ष, पुन्हा जेवण, मग नवरात्र, उपास, पूजा… आणि हो, मग दिवाळी वेगळ्यानं सांगायला नको. अखंड स्वयंपाक सत्र सातत्यानं सुरू. आणि अधेमधे येणारे समारंभ इत्यादी आहेच.

एक तरी सण सोहळा दाखवा की त्यात बायका निवांत बसून गप्पा मारताहेत, वाचताहेत, गाणी ऐकतात, टीव्ही पाहतातय… अगदी शांत… मंगळागौर सांगू नका. बायकाच सकाळी स्वयंपाक करतात, उपास करतात.

कोकणात खास करून माजघरात बसून जेवणारे पुरुष, ओटी वर बसून निवांत चील करत बसलेले पुरुष, आणि चुलीसमोर असणाऱ्या बायका बघून बघून मी थकले. नंतर गौरी. वास्तविक माहेरवाशिणींचा सण. पण पुन्हा बायका जुंपलेल्या. सजावट करा, आरास करा, पूजा करा, स्वयंपाक करा. गौरी पूजन बायकांचा सण. पण त्यांना उसंत कुठेय? पूजेची तयारी बायका करणार, पण पूजा करणार पुरुष, स्वयंपाक बायका करणार, प्रथम जेवणार पुरुष…

आणि हे सर्व परंपरा, संस्कृती यांच्या नावाखाली. यात सर्वांत वेदना होतात ते दलित, बौध्द समाजात वाढत जाणाऱ्या धर्म प्रस्थाचे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं त्याच्या अगदी उलट चालू असतं.

संस्कृती, धर्म इत्यादी जपायचा मक्ता निव्वळ बायकांच्या खांद्यावर असलेला दिसेल. पुरुष मात्र संस्कृतीचे झेंडे मिरवायला पुढे. न राहवून एक उदाहरण, नातेवाईकांकडे पूजेला गेले होते. पूजेला बसलेल्या बाईचं पूर्ण लक्ष जेवणाकडे. वरणाला कढ आला का? भात शिजला का? शिरा तयार आहे का? त्यांच्याकडून पुढील वर्षीही आमंत्रण आलं तेव्हा स्वच्छ विचारलं, ‘‘बयो, पूजा नक्की कशासाठी? जेवणासाठी की पुण्यासाठी? शांत चित्तानं बसत का नाहीस पूजेला? वर नवऱ्याची टिंगल… ‘‘हीचं असंच असतं. स्वयंपाकघर सोडवत नाही तिला.’’ न राहवून त्याला म्हटलं, ‘‘पुढील वर्षी तू कर स्वयंपाक. ती बसेल पूजा करत.’’ त्यावर उत्तर नाही.

समर्थन करणाऱ्या माणसाचा युक्तिवाद होता की आधी समाजीकरण नसायचं. अशा निमित्तानं माणसं यायची, विशेष करून बायका पाहुणे मेहुण म्हणून जायच्या. मूळ हेतू हा आहे… असं.

काही म्हणतात, शेकडो वर्षं हे चालू आहे. तर शेकडो वर्षं आधी जे जग होतं ते आहे का आता? बैलगाडी वापरता का आज? धोतर रोज नेसता का आज? बरं मान्य केलं की, हा हेतू आहे, धर्म रूढी पाळल्या जातात. पण बाकी सर्व बदललं आहे, बायकांचे कष्ट वगळता…

सण कशासाठी आहेत? माणसाला काही विरंगुळा, बदल मिळावा म्हणून. फक्त विरंगुळा मिळतो तो बायका सोडून सर्वांना.

एक पोस्ट बघितली, त्यात एक सज्जन बायकांच्या गाऊनवर टिंगल करत होता की, गणपती आले की त्याच दिवशी आमच्या बायका छान नाटतात, नंतर गाऊनमध्ये कायम. चुलीसमोर अखंड बसून पुरणपोळ्या मोदक इत्यादी करणं, बाकी काम, भांडी घासणं, अन्य तयारी हे सर्व साडीत करणं किती अवघड आहे. बरं बोलणारा स्वतः सुटसुटीत ड्रेसमध्ये.

मला इथे सण, धर्म, परंपरा यावर टीका करायची नाही. तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. मुद्दा आहे तो स्त्रियांवर पडणाऱ्या अधिक भाराचा. इथे शहाणपणा शिकवू नका की आमच्या घरातल्या बायकाना किंवा आम्हाला यात गैर वाटत नाही. कारण बाईचं मत हे पुरुष किंवा समाज ठरवतो. she just tow the line.

हे ज्यांना चूक वाटतंय त्यांच्यासाठी एक, सॉरी दोन साधे प्रश्न.

पहिला : कोणताही सण दाखवा, धार्मिक समारंभ- ज्यात बायका शांत निवांत बसल्यात, पूजा बघताहेत, पारायण करताहेत, गप्पा मारताहेत.

दुसरा : असा एकतरी उपास, व्रत वैकल्ये सांगा जे पुरुष करतात, आपली आई, वडील, अपत्ये, भाऊ, बहीण यांच्यासाठी. बायको खूप दूर, पुरुषाच्या रक्ताची नाती इथे घेतलीत.त्यां च्या आरोग्य, आयुष्य यांसाठी पुरुषाने करायचं व्रत, उपास… सांगणं एकच- परंपरा, रूढी या राहणारच. त्यात काय बदल करायचे हे दरवर्षी ठरवा. बाई आणि पुरुष दोघांनी मिळून एकत्र…