निर्धारित वेळेत हॉटेलमध्ये न परतल्याने बांगलादेशच्या अल अमीन होसेनवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. यानुसार अमीनला मायदेशी पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘‘१९ तारखेला बांगलादेशचे खेळाडू बाहेर गेले होते. परतण्याची वेळ रात्री १० निश्चित करण्यात आली होती. मात्र अल अमीनने या शिस्तीचा भंग केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खेळाडूला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ बाहेर राहायचे असल्यास संघ व्यवस्थापनाकडून तशी परवानगी घ्यावी लागते. मात्र अमीनने तशी परवानगी घेतलेली नव्हती,’’ असे बांगलादेश संघाचे व्यवस्थापक खालेद महमूद यांनी सांगितले.