वेस्ट इंडिजचा अपेक्षेप्रमाणे धुव्वा उडवून न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीचे निकाल सट्टेबाजांच्या अंदाजाप्रमाणे लागले. त्यामुळे अर्थात सट्टेबाजाराला फारसा फटका बसला नाही. logo07श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या संघांनी चमत्कार केला असता तर मात्र सट्टेबाजांना नुकसान सहन करावे लागले असते. परंतु तसे घडले नाही. सट्टेबाजांनी आता संपूर्ण लक्ष्य उपांत्य फेरीवर केंद्रित केले आहे. सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियालाच पसंती देणाऱ्या सट्टेबाजारात आताही ऑस्ट्रेलियाच सरस आहे. त्याखालोखाल न्यूझीलंडला पसंती देण्यात आली आहे. याचा अर्थ सट्टेबाजांच्या मते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा मुकाबला होईल. म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागेल. हे दोन्ही संघ चमत्कार करू शकतात याची कल्पना असलेल्या सट्टेबाजांनी त्यामुळेच उपांत्य फेरीच्या सामन्यांना भाव देताना खूपच सावधानता बाळगली आहे. याचा अर्थ या उपांत्य फेरीच्या सामन्यात काहीही घडू शकते.
सामन्यांचे भाव
भारत : ९५ पैसे, ऑस्ट्रेलिया : ७५ पैसे
न्यूझीलंड : ६५ पैसे, द. आफ्रिका : एक रुपया
निषाद अंधेरीवाला