गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने धावांचा पाठलाग उत्तमपणे केला आहे. भारतीय संघ कोणतेही आव्हान यशस्वीपणे पेलू शकतो, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केले आहे.
‘‘२०१३पासून भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकली, तर त्यांनी बहुतांशी सामने हे दुसऱ्यांदा फलंदाजी करताना जिंकले आहेत. ते कोणतेही आव्हान पार करू शकतात, याचे समीकरण महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या मनात पक्के बसले आहे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये भन्नाट कामगिरी केली असून ते कोणत्याही क्षणी सामन्याचा नूर पालटवू शकतात,’’ असे स्मिथ म्हणाला.
भारताच्या फलंदाजीबद्दल स्मिथ म्हणाला, ‘‘सुरेश रैना योग्य वेळी फॉर्मात आला आहे व सातत्याने त्याने ५०च्या सरासरीने धावा केल्या आहेत.