इशांत शर्मा हा भारताच्या ताफ्यातील सर्वात अनुभवी गोलंदाज होता, पण दुखापतीमुळे त्याला या विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. पण त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीवर जास्त फरक पडणार नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.
‘‘एका खेळाडूच्या अनुपस्थितीने संघावर मोठा परिणाम होत नाही, इशांतच्या अनुपस्थितीमध्ये अन्य गोलंदाजांनी चांगली कामगिरी करायला हवी. प्रत्येक खेळाडूला दुखापतीनंतर पुरेशी विश्रांती मिळायला हवी. गोलंदाजाला दुखापतीतून सावरणे फार कठीण असते,’’ असे गांगुली म्हणाला.