18 October 2019

News Flash

एमसीजीवर सचिनचा जयघोष

२०११ मध्ये सचिन तेंडुलकर विश्वचषकाचे आकर्षण होता. सचिनने विश्वविजेतेपदासह क्रिकेटविश्वाला अलविदा केला.

| March 30, 2015 12:43 pm

२०११ मध्ये सचिन तेंडुलकर विश्वचषकाचे आकर्षण होता. सचिनने विश्वविजेतेपदासह क्रिकेटविश्वाला अलविदा केला. चार वर्षांनंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या नावाची जादू काय किमया करू शकते याचा प्रत्यय मेलबर्न क्रिकेट मैदानावर आला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीला सचिन उपस्थित होता. प्रत्येक वेळी मैदानावर मोठय़ा पडद्यावर सचिन झळकताच प्रेक्षकांमध्ये जल्लोषाची लाट पसरत होती.
सचिनच्या हस्तेच सामनावीर जेम्स फॉकनर आणि मालिकावीर मिचेल स्टार्क यांना पुरस्कार देण्यात आले. निवेदक मार्क निकोलस यांनी सचिनचे नाव उच्चारताच ९० हजारपेक्षा जास्त चाहत्यांनी सचिनच्या नावाचा जयघोष केला.

First Published on March 30, 2015 12:43 pm

Web Title: sachin tendulkar welcomed with loud cheers at the mcg