भारताचा संघ सध्या चांगलाच फॉर्मात आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय संपादन केल्यामुळे सट्टेबाजारात सध्या भारताला चांगलाच भाव आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात wc11भारताला स्थान मिळेल, अशा दिशेने आता भाव देण्यात येऊ लागला आहे. भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचेल, यासाठी सट्टेबाजांनी ४५ पैसे असा भाव दिला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या शक्यतेबाबत आता अनुक्रमे ५५ पैसे आणि ६५ पैसे असा भाव आहे. शनिवारी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताला सहज विजय मिळेल. त्यामुळे भारताला त्यांनी फारसा भाव दिलेला नाही. त्याच वेळी संयुक्त अरब अमिरातीने काही चमत्कार केला तर पंटर्सजी धम्माल होईलच. परंतु भारताच्या सट्टेबाजारातील स्थानालाही धक्का बसेल. भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली तसेच आता शिखर धवन हे शतक झळकावतील, यासाठी अनुक्रमे ४५ व ५५ पैसे असा भाव देऊ करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात विश्वविजेतेपदाबाबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, भारत, श्रीलंका असा क्रम आहे. पहिल्या पाचांत सुरुवातीला इंग्लंडला सट्टेबाजांनी स्थान दिले होते.
सामन्यांचे भाव
* भारत : १५ पैसे; संयुक्त अरब अमिराती : तीन रुपये
* इंग्लंड : ६५ पैसे;  श्रीलंका : सव्वा रुपया