विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना मंगळवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या बलाढय़ संघांमध्ये रंगणार आहे. सट्टेबाजारात आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी पसंती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी ८० पैसे, तर न्यूझीलंडसाठी सव्वा रुपये भाव देण्यात आला आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीबाबत पंटर्सचा ऑस्ट्रेलियाच्या क्षमतेवर इतका विश्वास आहे की, भारत जिंकेल, असे त्यांना अजिबात वाटत नाही. त्यामुळेच आता ऑस्ट्रेलियाला ४५ पैसे देताना भारतासाठी दोन रुपये भाव देऊ करण्यात आला आहे. यावरून सट्टेबाजांनी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशी पसंती देण्यात आली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांनीही असाच क्रम दिला आहे. न्यूझीलंड आणि भारत हे संघ अंतिम फेरीत
लढतील, यासाठी चौथे स्थान
देण्यात आले आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीला दुसरे आणि दक्षिण आफ्रिका-भारत लढतीला तिसरे स्थान देण्यात आले आहे. परंतु २९ मार्चला मेलबर्न येथे विश्वविजेतेपदाची माळ ऑस्ट्रेलियाच्याच गळ्यात पडणार, याबाबत सट्टेबाजार ठाम आह.
सामन्याचे भाव
*न्यूझीलंड :     द. आफ्रिका :
सव्वा रुपया    ८० पैसे.
*भारत :     ऑस्ट्रेलिया :
दोन रुपये    ४५ पैसे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Betting south africa and australia at top
First published on: 23-03-2015 at 12:08 IST