विश्वचषक विजेते म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडने नमवल्यानंतर सट्टेबाजारातही मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाली. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियालाही पराभव चाखावा लागला. भारताला अद्याप पराभवाचा चटका बसलेला नाही. मात्र या सर्व घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत त्यामुळे समीकरणातही बदल होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाला जेमतेम दीडशेचा टप्पा गाठता आल्यानंतर न्यूझीलंड सहज विजय मिळवेल, असे सट्टेबाजांना वाटत होते. परंतु न्यूझीलंडलाही विजयासाठी शेवटपर्यंत झगडावे लागले. रोमहर्षक अशा या लढतीमुळे न्यूझीलंडला मात्र आता दुसरा क्रमांक मिळाला आहे. ऑस्ट्रेलियालाच सट्टेबाजांनी अद्यापही विश्वचषक जेतेपदाचा मान दिला आहे.
सामन्याचा भाव
पाकिस्तान : २५ पैस       झिम्बाब्वे : सव्वातीन रुपये
निषाद अंधेरीवाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan v zimbabwe betting odds
First published on: 01-03-2015 at 12:03 IST