पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत संयमी शतकी खेळीनंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षांव होत आहे. या पंक्तीमध्ये वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू मायकेल होल्डिंग यांचाही समावेश आहे.
‘‘चांगल्या सुरुवातीचे शतकात रूपांतर ही कोहलीची ताकद आहे. एकदा त्याने धावा जमवायला सुरुवात केली की तो शतक करूनच थांबतो. प्रत्येक दर्जेदार फलंदाजाकडून हीच अपेक्षा असते. १५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने २२ शतके झळकावली आहेत. अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्याचे कोहलीचे प्रमाण ६.५ इतके प्रभावी आहे. फलंदाज म्हणून कौशल्याला त्याने न्याय दिला आहे,’’ अशा शब्दांत होल्डिंग यांनी कोहलीची प्रशंसा केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजांना शतक करण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र सलामीसह चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूंना ही संधी मिळते. कोहली या संधीचे सोने करतो.’’
भारताच्या गोलंदाजीविषयी विचारले असता होल्डिंग म्हणाले, ‘‘मोहम्मद शमीने सुरेख गोलंदाजी केली. उमेशने चांगल्या वेगाने गोलंदाजी केली. गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला तरच विकेट्स मिळतात. महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांचा चतुराईने उपयोग केला.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्यलडविरुद्ध वेस्ट इंडिजची कामगिरी सुमार झाली. तीनशे धावांचे लक्ष्य त्यांना गाठता आले. मात्र तीनशे धावा केल्यानंतर निर्धास्त राहणे वेस्ट इंडिजसाठी घातक ठरले. सातत्याचा अभाव हे वेस्ट इंडिजच्या पराभवाचे आणखी एक कारण आहे. वेळीच सुधारणा न केल्यास वेस्ट इंडिजला प्राथमिक फेरीतूनच माघारी जावे लागू शकते.
– मायकेल होल्डिंग

Web Title: Virat kohli converts his starts into three figures says michael holding
First published on: 18-02-2015 at 02:41 IST