विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीतच अनेक धक्कादायक निकाल लागत असल्यामुळे सट्टाबाजारही चांगलाच ढवळून निघाला आहे. पाकिस्तानबरोबरच्या सामन्यात अनपेक्षित निकाल लागल्याने सट्टेबाजांना चांगलाच धक्का बसला. पाकिस्ताननेही दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यामुळे सट्टेबाजांना चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. ‘ब’ गटात सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला पसंती देणाऱ्या सट्टेबाजांनी आता भारताच्या बाजूने कौल लावला आहे. अर्थात, वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा सामना जिंकून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या भारताचा भाव थोडाफार वधारला आहे. तो आणखी वधारेल असा अंदाज आहे. भारताचे आर्यलड आणि झिम्बाब्वे या दोन संघांबरोबर सामने बाकी आहेत. या सामन्यांसाठी सट्टेबाजांनी भारताच्या बाजूनेच दान टाकले आहे. आर्यलडविरुद्धच्या सामन्यात सहज विजय मिळेल, असे भाकीत करणाऱ्या सट्टेबाजांनी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताला झगडावे लागेल, अशा रीतीने भाव देऊ केला आहे. दोन पराभवांमुळे दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक विजेतेपदाला धक्का बसेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पुन्हा विश्वचषकजेतेपद कोण पटकावणार, यावर सट्टेबाजारात उलटसुलट मतप्रवाह व्यक्त केले जात आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आता भारताकडे आशेने पाहिले जात आहे. दक्षिण आफ्रिका काही काळापुरता मागे पडला आहे. त्यातल्या त्यात श्रीलंकेलाही आता स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला झुकते माप देण्यात आले आहे.
सामन्याचा भाव
ऑस्ट्रेलिया     श्रीलंका
३० पैसे    २.२५ रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup betting
First published on: 08-03-2015 at 05:33 IST