लोकांच्या विदेशवारीवर खर्चातील वाढ ही अर्थव्यवस्थेतील स्थिरत्व व सुबत्तेचे एक लक्षण मानले जाते. भारतीयांकडून गतवर्षांतील जुलैमधील ४ लाख डॉलरच्या तुलनेत यंदाच्या म्हणजे जुलै २०१५ मध्ये विदेशात सहल-प्रवासावरील खर्चाची रक्कम चार पटीने वाढून १५ लाख डॉलरवर गेली आहे. अर्थात रिझव्‍‌र्ह बँकेने या संबंधाने शिथिलता आणणारा निर्णय ३ फेब्रुवारी २०१५ रोजी जाहीर केला, त्यानुसार निवासी भारतीयांना प्रत्येक आर्थिक वर्षांत कमाल खर्चाची मुभा सव्वा लाख डॉलरवरून दुपटीने वाढून अडीच लाख डॉलर केली गेली. अर्थात वाढीव मुभेचा वापर परदेशात प्रवास-पर्यटन, वैद्यकीय उपचार तसेच शैक्षणिक खर्चासाठी निवासी भारतीयांना करता येणार आहे. सोबतच्या  ग्राफिकमध्ये केवळ पर्यटन-प्रवासावरील खर्चातील वाढ दर्शविली आहे.