रिलायन्स कॅपिटलची स्वतंत्र गृह वित्त कंपनी शुक्रवारी भांडवली बाजारातील पदार्पणालाच भाव कमावून गेली. रिलायन्स होम फायनान्सच्या समभागाचे मूल्य सूचिबद्धतेलाच ५ टक्क्यांनी वाढले. परिणामी बाजारात नव्या असलेल्या या कंपनीचे भांडवल ५,२९१.३५ कोटी रुपये झाले आहे.

विशेष म्हणजे सप्ताहअखेर प्रमुख निर्देशांकांनी त्यांची गेल्या वर्षभरातील सर्वात मोठी सत्रआपटी नोंदविली. तुलनेत अनिल अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलच्या अखत्यारितील रिलायन्स होम फायनान्सची नोंदणी मूल्यवाढीने झाली.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

कंपनीने व्यवहारात प्रति समभाग १०७.२० रुपये या सर्वोच्च टप्प्यापेक्षा अधिक, १०९.२० पर्यंत मजल मारली. मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या ११.५५ लाख तर राष्ट्रीय शेअर बाजारात १० लाख समभागांचे व्यवहार झाले.

कंपनीच्या सूचिबद्धतेकरिता रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे पत्नी टीना व पुत्र अनमोल, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र सुधाळकर आदी यानिमित्ताने राष्ट्रीय शेअर बाजार इमारतीत झालेल्या समारंभास उपस्थित होते.

रिलायन्स होम फायनान्सचे कार्यकारी संचालक अनमोल अंबानी यांनी या वेळी कंपनीचा भर परवडणाऱ्या दरातील घरांसाठी वित्तपुरवठा करण्यावर असेल, असे स्पष्ट केले. वार्षिक ५० टक्के वाढीसह कंपनीचे २०२० पर्यंत ५०,००० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्टही अनमोल यांनी या वेळी जाहीर केले.

म्युच्युअल फंड, आयुर्विमा तसेच सर्वसाधारण विमा क्षेत्रात कार्यरत रिलायन्स कॅपिटलचा या गृह वित्त कंपनीत ५१ टक्के हिस्सा आहे.