av-05
मागील भागात राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएसची ठळक वैशिष्टय़े जाणून घेतली. एखाद्या तीस वर्षांच्या व्यक्तीने दरमहा पाच हजार रुपये पुढील तीस वष्रे करवजावट मिळविण्यासाठी पीपीएफ खात्यात, एनपीएसच्या ‘ई क्लास’मध्ये आणि म्युच्युअल फंडांच्या ‘ईएलएसएस’ योजनांमध्ये गुंतविले तर ३० वर्षांनंतर किती रक्कम जमा होईल याचा ढोबळ अंदाज मागील सोमवारी घेतला. राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या ‘ई क्लास’ मधली बचत/ गुंतवणुकीवर होणाऱ्या नफ्याचा दर साडे चौदा टक्के धरला तर दोन कोटी ७४ लाख जमा होतील व सक्तीची ४० टक्के गुंतवणूक वजा जाता एक एक कोटी ४० लाख हातात शिल्लक राहतात. यावर इंडेक्सेशनप्रमाणे कर जरी भरावा लागला तरी ही मिळणारी ही रक्कम निव्वळ ‘पीपीएफ’मधील गुंतवणुकीमधून मिळणाऱ्या रकमेच्या दुपटीहून अधिक आहे. तथापि बचतकर्त्यांची जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल तरच त्यांनी एनपीएस मधील ‘ई क्लास’चा विकल्प स्वीकारावा.
av-06
दोन आकडय़ांमधील परताव्याचा दर केवळ समभाग गुंतवणूकच देऊ शकते. पेन्शन फंड निधी व्यवस्थापकांची झळझळीत कामगिरीचा पुरावा (वरील चौकट पाहा) सोबत दिला आहे. साहजिकच उदाहरणासाठी गृहीत धरलेला १४ टक्के दर अवास्तव आहे असा कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. ३० वर्षे वयाच्या खातेधारकाने पुढील ३० वष्रे दरमहा पाच हजार रुपये जमा केले तर गुंतवणुकीवरील परताव्याच्या वेगवेगळ्या दराने जमा होणारी रक्कम वरील कोष्टकात दिली आहे. अनेकदा सरकारी नोकरीत नवीन दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे एनपीएस खाते चटावरचे श्राद्ध उरकावे असे उरकले जाते. त्याला उपलब्ध ‘ई’,’सी’ व ‘जी’ क्लास पर्याय म्हणजे काय हे त्याच्या गावीही नसते. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी एनपीएस मध्ये ‘ई क्लास’ स्वीकारला नाही, परंतु शेयर बाजारातील गुंतवणुकीची जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल त्यांनी ई क्लास विकल्प लवकरात लवकर स्वीकारणे जरुरीचे आहे. हा बदल केवळ एप्रिल महिन्यापासून करता येतो. यातील मध्यममार्ग म्हणजे ‘लाईफ सायकल फंड’ ज्या पर्यायात वाढत्या वयानुसार दरवर्षी समभाग गुंतवणुकीचे प्रमाण दोन टक्के कमी होते.    
या योजनेच्या बाबतीत काही आक्षेप नोंदले गेले आहेत. पहिला आक्षेप हा की तुलनेसाठी घेतलेल्या योजना ‘ईईई’ प्रकारच्या आहेत. म्हणजे पीपीएफ, ईएलएसएस योजनांत केलेली गुंतवणूक कर वजावटीस पात्र असलेली, त्यावर मिळणारे उत्पन्न करमुक्त व मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त आहे. या उलट एनपीएस ही योजना ‘ईईटी’ प्रकारची आहे. या योजनेचे पहिले दोन घटक करमुक्त असले तरी वयाच्या साठाव्या वर्षी हाती पडणाऱ्या एकूण रकमेपकी ६० टक्के रक्कम त्यावर्षी व दरमहा मिळणाऱ्या पेन्शनवर आजच्या कर कायद्यानुसार  दरवर्षी कर भरावा लागेल. आजचे एनपीएस खातेधारक १५-२० वर्षांनी साठीत प्रवेश करतील. त्या आíथक वर्षांचे आयकर रिटर्न ही मंडळी दाखल करतील त्यावेळी हे उत्पन्न करपात्र असेल किंवा कसे हे ठरेल. देशाच्या करविषयक कायद्यात मोठे बदल होऊ घातले आहेत. प्रत्यक्ष कर संहिता (डीटीसी) लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा कायदा लागू झाल्यावर कुठले आíथक स्त्रोत करमुक्त असतील याची यादी डीटीसीच्या मसुद्यात शेडय़ूल सहामध्ये दिली आहे. या यादीत “any payment from New Pension System Trust to an employee having an account with the Trust under the New Pension Scheme notified by the Central Government.”  असा उत्ल्लेख असल्याने पुढील १५ वर्षांत डीटीसी सध्या आहे त्या रुपात लागू झाल्यास सर्वच उत्पन्न करमुक्त असेल. परंतु डीटीसी कधी लागू होईल, लागू झाल्यास आहे त्या स्वरूपात लागू होईल का याची उत्तरे खुद्द अर्थमंत्रीसुद्धा देऊ शकतील का या विषयी साशंकता आहे. अ‍ॅन्यूईटीचा दर सहा-साडेसहा गृहीत धरून आपल्याला जितकी पेन्शन मिळावी अशी अपेक्षा आहे, तितकी रक्कम एनपीएसमध्ये जमा झाल्यास सर्व रक्कम आजच्या कायद्यानुसारसुद्धा करमुक्तच आहे. एखाद्याला २५ हजाराच्या पेन्शनची अपेक्षा असल्यास ४०लाखाचा निधी एनपीएसमध्ये जमा करून पेन्शनसाठी वापरल्यास हे ४० लाख आजही करमुक्त आहेत.  
तिसरा आक्षेप असा की पीपीएफ हा एनपीएसपेक्षा उत्तम पर्याय आहे. दोन समान गोष्टीत तुलना होते. पीपीफ खाते हे मुदतपूर्ती वेळी मोठी बचत उपलब्ध करून देणारी योजना आहे. एनपीएस ही मोठय़ा बचतीच्या जोडीला अ‍ॅन्युइटी म्हणजे दरमहा पेन्शन देणारी योजना आहे. एनपीएस मध्ये ‘ई क्लास’ हा पर्याय उपलब्ध आहे. जो पीपीएफमध्ये नाही. ‘ई क्लास’ एनपीएसच्या परताव्याचा दर पीपीएफपेक्षा अधिकच असणार. एनपीएस ही योजना ऊकााएफएऊ DIFFERED ANNUITY प्रकारची आहे. पीपीएफमध्ये दरवर्षी जमा रकमेपकी काही रक्कम पाच वर्षांनंतर काढता येते. एनपीएसमध्ये हा पर्याय नाही. साहजिकच एनपीएस व पीपीएफ यांची तुलना होऊ शकत नाही.
ही योजना मग नक्की कोणासाठी अधिक फायद्याची ठरणार आहे, असा प्रश्न कोणाच्या मनात आला असेल. एनपीएस खाते उघडण्यापूर्वी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, वयाची साठ वष्रे पूर्ण होईपर्यंत या खात्यातून जमा रक्कम काढण्याचे नियम कडक आहेत. सहजासहजी या योजनेतून जमा रक्कम काढता येणार नाही. साहजिकच पुढील अनेक वष्रे आपल्याला ज्या पशाची गरज भासणार नाही इतकेच पसे या खात्यात जमा करावे. म्हणजे ही योजना जे ३५ वष्रे वयाच्या आत असतील जे ३० टक्के कर कक्षेत आहेत, व दीर्घ काळ गुंतवणूक करू शकतील आणि या पशाची त्यांना गरज भासणार नाही, अशांना ही योजना सर्वात फायद्याची ठरेल. तात्कालिक फायद्याचा विचार करणारी मंडळी गुंतवणुकीचे मूळ चक्रवाढ किंवा CAGR परतावा विसरली आहेत असेच म्हणावे लागेल.    
शेवट करताना मराठीतील ज्येष्ठ कवी ‘अनिल’ यांची दशपदी आठवते

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजली कवळी पाने, असूनी निगराणी
अशी कुठे लागली आग, जळती जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके वन सारे
किती दूरची लागे झळ, आतल्या जीवा
गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा
किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघूनी भवताली
पुरेशा रोकड सुलभतेला एनपीएसचे कुंपण नसेल तर फुललेल्या बागेला कोमेजायला वेळ लागणार नाही हाच या निमित्ताने अर्थबोध.
shreeyachebaba@gmail.com

ugc net exam marathi news, ugc net exam online application form marathi news
‘युजीसी नेट’ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जाहीर, कधी होणार परीक्षा?
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
Lower voter turnout in Maharashtra than national average What is the national average voter turnout
राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात कमी मतदान, मतदानाची राष्ट्रीय सरासरी किती?