22 August 2017

News Flash

मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची औरंगाबादेत रंगीत तालीम

'एक मराठा लाख मराठा' नारा पुन्हा दुमदुमला

औरंगाबाद | Updated: August 1, 2017 5:36 PM

हजारोंच्या संख्येने महिला युवती आणि युवक या रॅलीत सहभागी झाले आहेत.

क्रांतीदिनी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मुंबतील मोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने ही रंगीत तालीम असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. मराठा मूक मोर्चाप्रमाणे वाहन रॅलीतही महिला आघाडीवर होत्या.
मराठा क्रांती मोर्चाच्या वाहन रॅलीला छत्रपती महाविद्यालयापासून सुरुवात झाली. गजानन मंदिर, क्रांती चौक, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे कॅनॉट परिसरात रॅलीचा शेवट करण्यात येणार आहे. हजारोंच्या संख्येने महिला युवती आणि युवक या रॅलीत सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा जय घोषाने शहराचे मुख्य रस्ते दणाणून गेले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पहिला मूक मोर्चा औरंगाबादमधून काढण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात विविध शहरात मोठ्या संख्येने ५७ मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे मोर्चे काढण्यात आले. मात्र कोणतेही ठोस आश्वासन मिळालं नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये नियोजन बैठकाही घेण्यात आल्या. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

First Published on August 1, 2017 1:10 pm

Web Title: before mumbai maratha kranti morcha bike rally in aurngabad
 1. V
  varad
  Aug 1, 2017 at 10:54 pm
  मराठा मोर्चा असो कि शेतकरी आंदोलन ...प्रत्येक वेळी "चंद्रकांत पाटील " पुढे येत आहेत . मग सध्याचं मुख्यमंत्रांना काय खुर्ची उबवायला ठेवले आहे का ? मुख्यमंत्रांची क्रेडिबिलिटी ० आहे.
  Reply
 2. V
  varad
  Aug 1, 2017 at 10:52 pm
  मराठा मोर्च्या ची हि तर फक्त झलक आहे ....मुंबई अभी बाकी हें
  Reply
 3. V
  varad
  Aug 1, 2017 at 10:52 pm
  हाथी चले बाजार .....भोंकें हजार....!! अरे रॅली तील २०-२५ च्या स्पीड साठी हेल्मेट घालायचं फुकट सॅले देणारे " आमच्या कडे डोके आहे म्हण्टले" ..!!1
  Reply
 4. V
  Vijay
  Aug 1, 2017 at 4:57 pm
  आता मुंबईच्या मोर्चात किती नवीन मागण्या जोडतात काय माहित. हे बरंय म्हणा अन्याय करणारेच न्यायासाठी उलट्या बोंबा मारतात
  Reply
 5. A
  Ameya
  Aug 1, 2017 at 3:22 pm
  सगळे विदाउट हेल्मेट दुचाकी चालवताना दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का? मोर्चा काढा, आंदोलने करा पण असे उघड उघड नियम पायदळी तुडवू नका
  Reply
 6. S
  sach
  Aug 1, 2017 at 2:47 pm
  आता फॉर्च्युनर मधून मोर्चा काढा. त्याच्या पुढं राष्ट्रवादीच्या नेत्यांना ठेवा.
  Reply
 7. R
  Ramdas Bhamare
  Aug 1, 2017 at 1:20 pm
  आजपर्यंतच्या मराठा क्रांती मोर्चाचा अनुभव पाहता हा मोर्चा महाराष्ट्रात भाजपचा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी आणि सेल्फ्या काढण्यासाठी आहे हे नक्की !
  Reply
 8. Load More Comments