पैठण बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलने बाजी मारली. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीत वाघचौरे यांचे बंधू कैलास वाघचौरे पराभूत झाले. सर्व १८ जागांवर भूमरे यांचे समर्थक निवडून आले आहेत. भूमरे यांना विजयासाठी काँग्रेसच्या मंडळींनीही सहकार्य केले.

PM Narendra Modi On Congress
‘राहुल गांधींनी अमेठी सोडलं, आता वायनाडही सोडावं लागणार’, पंतप्रधान मोदींचा नांदेडमधून काँग्रेसवर निशाणा
rahul gandhi
काँग्रेसच्या अमेठीतील उमेदवाराबाबत संदिग्धता
candidates contesting lok sabha elections meet voters
काँग्रेस, वंचितच्या उमेदवाराला मतदारांची मदत; भाजप उमेदवाराकडून मतदारांना ‘मोदींचा नमस्कार’
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप

पैठण कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी शिवसेनेने चांगलीच तयारी केली होती. काँग्रेसचे रवींद्र काळे यांची साथ मिळवत भूमरे यांनी बेरजेचे गणित केले. काळे यांचा या विजयात महत्त्वाचा वाटा राहिला. त्यामुळे निवडणूक निकालानंतर निघालेल्या विजयी मिरवणुकीत शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाबरोबर काँग्रेसचे झेंडेही होते. हा विजय धनशक्तीचा आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम उमेदवारांनी प्रत्येक मताला किंमत मोजल्याचा आरोप माजी आमदार वाघचौरे यांनी केला आहे. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : राम एरंडे (५६६), कैलास कळसकर (५९४), माणिक खरात (५८९), अंबादास गवारे (५६१), सुरेश दुबाले (५६३), केदार शिंदे (५०६), विजय हजारे (४६५), कुसुमबाई बोंबले (६३८), सुनंदा मोगल (५९९), राजेंद्र किसे, योगेश सोलाट (६३५), राजू भूमरे (६७८), भाऊसाहेब लबडे (६४६), कारभारी लोहेकर (६४), भागिनाथ नाटकर (६४०), महावीर काला (४३५), महेश मुंदडा (४०७).