मेष – एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने आपले खरे मित्र कोण आणि दिखाऊ साथीदार कोण याची परीक्षा या आठवडय़ामध्ये होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी असल्यामुळे तुम्हाला आळस येईल.  नोकरीमध्ये  नेहमीच्या कामामध्ये एखादी वेगळी कल्पना अमलात आणून तुम्ही गिऱ्हाइकांना आकर्षति करण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये तुमच्यातील कल्पकता, सौंदर्याचा दृष्टिकोन इतरांना दिसून येईल.

वृषभ – तुमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होणार आहे. करियरकडे लक्ष दिले तर घरातल्या जबाबदाऱ्यांकडे कमी वेळ द्यावा लागेल. घरात लक्ष दिले तर करियरमधली एखादी संधी हातातून निसटायची भीती वाटेल. त्यामुळे तुम्हाला विश्रांती अशी मिळणार नाही. व्यवसाय-उद्योगात ज्या कामाकडे तुमच्या हातून कळत नकळत कानाडोळा झाला होता त्याकडे आता तातडीने लक्ष घालावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक काम महत्त्वाचे असेल. विश्रांती मिळणार नाही. घरामध्ये कर्तव्य आणि मौजमजा यांचा सुरेख समन्वय साधाल.

मिथुन – एकाच वेळेला अनेक चांगल्या कल्पना तुमच्या मनात दौडत असतील. कधी कधी विचारांचे काहूर माजल्यामुळे नेमके कशाला महत्त्व द्यावे असा मनामध्ये गोंधळ उडेल. थोडेसे स्वार्थी बना. ज्यात तुमचा आíथक फायदा होणार आहे,  व्यवसाय-उद्योगात लांबलेल्या कामांना मुहूर्त लाभेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील. नोकरीमध्ये चांगल्या संधीकरता तुमची निवड होईल. घरामध्ये मात्र फारसे लक्ष देता न आल्याने इतरांचा गरसमज होईल.

कर्क – पसा ही एक अशी चीज आहे ज्याची भल्याभल्यांना भुरळ पडते. वास्तविक पाहता तुम्ही यातले नाही.  व्यापारउद्योगात नवीन भागीदारी किंवा मत्री कराराचे प्रस्ताव पुढे येतील. त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये इतरांना मदत करण्यापूर्वी आपले काम वेळेत आणि संस्थेच्या गरजेनुसार पार पाडा. घरामध्ये जो काम करतो त्याच्याच मागे काम लागते. असा अनुभव येईल. तुम्ही अलिप्त राहण्याचे धोरण ठरवाल.

सिंह – ज्या कामातून तुमचा निश्चित फायदा होणार आहे अशा कामावर लक्ष केंद्रित करा. व्यापार-उद्योगातील कामाच्या निमित्ताने एखाद्या नवीन व्यक्तीकडून तुम्हाला काही नवीन कल्पना ऐकायला मिळतील. नोकरीमध्ये तुमच्या कर्तव्याला आधी प्राधान्य द्या. वेळ मिळाला तरच सहकाऱ्यांना मदत करा. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये ज्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालाल त्यामध्ये इतरांना तुमच्याकडे बघून नवचतन्य लाभेल.

कन्या – नुकताच गुरू धनस्थानात आल्यामुळे तुमच्या इच्छा आकांक्षा वाढायला सुरुवात झाली आहे. या आठवडय़ात तुमच्यासमोर बरेच पर्याय असल्यामुळे नेमका कोणता पर्याय आहे याविषयी मनात गोंधळ होईल. व्यापार-उद्योगात आíथक प्राप्ती वाढविण्याच्या दृष्टीने एखादा मोठा प्रोजेक्ट हाती घ्यावासा वाटेल. नोकरीमध्ये तुम्हाला विशिष्ट कामगिरीकरिता जादा अधिकार दिल्यामुळे तुमच्या संस्थेमध्ये तुमचे वजन वाढेल. घरामध्ये सर्वाची मोट बांधणे कठीण होईल. शेवटी तुम्ही सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करायचे ठरवाल.

तूळ – तुम्हाला काम करायची खूप इच्छा असेल, पण ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात ते आपला शब्द फिरवतील. तुम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. व्यापारउद्योगात मत्री आणि पसा यांच्यात झालेली गल्लत महागात पडेल. नोकरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष काम कमी, पण कामाचा पसाराच जास्त असेल. तुम्ही टिवल्याबावल्या करत काम कराल. घरामध्ये स्वत:ची इच्छा पूर्ण करण्याकरिता एखादा खास कार्यक्रम आखाल. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक – ग्रहमान बदलले की मन:स्थिती आणि सभोवतालचे वातावरण बदलायला सुरुवात होते. आता गुरू व्ययस्थानात आल्यामुळे सहज आणि सोप्या वाटणाऱ्या गोष्टी थोडय़ाफार अवघड होऊन जातील. तुमची रास भक्कम आहे. अशा परिस्थितीतही तुम्ही उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा झापाटा चांगला असेल. अनुपस्थित सहकाऱ्याचेही काम करावे लागेल. घरामध्ये प्रत्येक जण तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील.

धनू – गुरू हा ग्रह तुमच्या राशीचा अधिपती असल्याने तुम्ही आनंदी आणि उत्साही असता. ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणाचे वातावरण हलकेफुलके बनविता. या आठवडय़ात व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात थोडीशी मंद वाटेल. नंतर मात्र चांगले काम होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या आवडीचे काम मिळाल्यामुळे तुमची तक्रार नसेल. घरामध्ये प्रत्येकाला तुमच्या सल्ल्याच्या सक्रिय मदतीचा आधार वाटेल.

मकर – ग्रहस्थिती म्हणजे सावली पकडण्याचा प्रकार आहे. खूप पसे मिळावे म्हणून एखाद्या प्रोजेक्टचा विचार कराल. थोडे प्रयत्न केल्यावर असे लक्षात येईल की त्यामध्ये तथ्य नाही. व्यापार-उद्योगात नवीन हितसंबंध अवश्य जोडा. जुने काम घाईने बंद करू नका. नोकरीमध्ये सत्य परिस्थिती काय आहे हे समजल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नका. नवीन नोकरीचा स्वीकार करण्यापूर्वी नीट विचार करा. घरामध्ये काही जुने प्रश्न असतील तर त्यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या प्रश्नावर उपाय निघतील.

कुंभ – अंधारामध्ये चाचपडणाऱ्या माणसाला प्रकाश दिसल्यानंतर जो आनंद होतो तसा आनंद तुम्हाला होईल. तुमच्या कामाची गती वाढविण्याकरिता प्रकृतीकडे लक्ष ठेवा. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन प्रोजेक्टवर विचार कराल. प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदतीचे आश्वासन मिळेल. नोकरीमध्ये कंटाळवाण्या कामातून सुटका होईल. नवीन आणि तुम्हाला आवडणारे काम मिळेल. घरामध्ये काही वादविवाद झाले असतील तर त्यावर तोडगा निघेल.

मीन – निरभ्र आकाशात अचानक ढग आल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते तशी परिस्थिती निर्माण होईल. घाबरून न जाता मन खंबीर करा आणि निश्चयाने पुढे जा. व्यापार-उद्योगात प्रतिस्पध्र्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवा.  तुमचे बेत इतरांना सांगू नका. पशाचा काटकसरीने वापर करा. नोकरीमध्ये प्रत्यक्ष काम कमी, दिखावा जास्त असे काम असेल. घरामध्ये एखादा करमणुकीचा कार्यक्रम ठरेल. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com