भारतीय वायुसेनेत एनसीसी स्पेशल एन्ट्री आणि मेटिओरॉलॉजी ब्रँचमधील कोस्रेससाठी प्रवेश. जुलपासून सुरू होणाऱ्या कोस्रेससाठी पुरुष आणि महिला पात्र आहेत.

१) फ्लाइंग ब्रँच –

पात्रता – (अ) एनसीसी एअर िवग सीनियर डिव्हिजन ‘सी’ सर्टििफकेट (६ ऑगस्ट २०१५ किंवा नंतर प्राप्त केलेले) (ब) १२वीला गणित आणि फिजिक्स विषयात प्रत्येकी ६०% गुण (क) पदवी (कोणत्याही शाखेतील) सरासरी किमान ६०% गुण किंवा बी.ई. सरासरी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९४ ते १ जुल १९९८ दरम्यानचा असावा.

उंची – १६२.५ सें.मी. प्रशिक्षण कालावधी – ७४ आठवडे.

(२) ग्राऊंड डय़ुटी (नॉन टेक्निकल) मेटिओरॉलॉजी ब्रँच.

पात्रता – (१) एमएससी/विज्ञान – कोणत्याही शाखेतील/गणित/स्टॅटिस्टिक्स/ जीओग्राफी/कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स इ. सरासरी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (२) बीएस्सी (फिजिक्स/गणित विषयात प्रत्येकी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.)

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुल १९९२ ते १ जुल १९९८ दरम्यानचा असावा.

उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी.

पात्रता – परीक्षेच्या अंतिम वर्षांतील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अट- निकाल १५ जुलै २०१८ पर्यंत जाहीर होणे आवश्यक.

प्रशिक्षण कालावधी – ५२ आठवडे. कायदा विषयातील पदवीधर उमेदवारांना आयएएफच्या लिगल विभागात काम करण्याची संधी मिळू शकेल.

वेतन – अंदाजे दरमहा रु. ८४,०००/-.

निवड पद्धती – पात्र उमेदवारांना एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड (एएफ्एस्बी) डेहराडून, म्हैसूर, गांधीनगर किंवा वाराणसी येथे तीन स्तरांवर होणाऱ्या टेिस्टगसाठी बोलाविले जाईल. वैद्यकीय तपासणी एएफसीएमई, नवी दिल्ली किंवा आयएएफ, बँगलोर येथे होईल. ऑनलाईन अर्ज www.careerairforce.nic.in या संकेतस्थळावर दि. ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.

पदवीधर उमेदवारांना डिफेन्स सíव्हसेसमध्ये अधिकारी होण्याची संधी. कंबाइंड डिफेन्स सíव्हसेस एक्झामिनेशन (सीडीएस- २) दि. १९ नोव्हेंबर २०१७ रोजी यूपीएससी घेणार आहे.

१) इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए), डेहराडून – १०० जागा (१३ जागा एनसीसी ‘सी’ सर्टििफकेट आर्मी िवगसाठी राखीव.)

२) ऑफिसर्स ट्रेिनग अकॅडमी (ओटीए) चेन्नई – २२५ जागा  महिलांसाठी १२ जागा (५० जागा एनसीसी ‘सी’ सर्टििफकेट असणाऱ्यांसाठी राखीव).

३) इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी (आयएनए) इझिमाला – ४५ जागा (६ जागा एनसीसी ‘सी’ सर्टििफकेट (नेव्हल िवग) साठी राखीव)

४) एअरफोर्स अकॅडमी, हैद्राबाद – ३२ जागा.

वयाच्या २५ वर्षांपर्यंतचे उमेदवार सीडीएस परीक्षेसाठी अविवाहित असणे आवश्यक. ट्रेिनग दरम्यान लग्न न करण्याची अट मान्य करावी लागेल. महिला उमेदवार फक्त ओटीएसाठी पात्र आहेत. त्यांनी अर्जामध्ये ओटीएचा पहिला प्रेफरन्स (पसंतीक्रम) द्यावा.

पात्रता –

१) आय्एम्ए आणि ओटीएसाठी – पदवी.

२) इंडियन नेव्हल अकॅडमी – इंजिनीअरिंगमधील पदवी.

३) एअरफोर्स अकॅडमी – १२ वी फिजिक्स आणि गणित विषयात उत्तीर्ण असलेले पदवीधर. (पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करू शकतात.)

वयोमर्यादा –

१) आयएमए आणि आयएनएसाठी उमेदवाराचा जन्म २ जुल १९९४ आणि १ जुल १९९९ दरम्यानचा असावा.

२) ओटीए – उमेदवाराचा जन्म २ जुल १९९३ ते २ जुल १९९९ दरम्यानचा असावा.

३) आयएफए – उमेदवाराचा जन्म २ जुल १९९४ ते १ जुल १९९८ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड –

आर्मीसाठी – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी.

नेव्हीसाठी – उंची – पुरुष – १५७ सें.मी. एअरफोर्स अकॅडमीसाठी – उंची – पुरुष – १६२.५ सें.मी. ई-अ‍ॅडमिट कार्ड www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.

परीक्षा शुल्क – रु. २००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ)

ऑनलाईन अर्ज www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर दि. ८ सप्टेंबर २०१७ (सायंकाळी ६.00 वाजे)पर्यंत करावेत.