महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे उपलब्ध असणाऱ्या विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत-

  • एकवर्षीय पदव्युत्तर समोपदेश प्रमाणपत्र अभ्यासक्रम- आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • एकवर्षीय पदव्युत्तर मनो-सामाजिक पुनर्वसन व समोपदेशन प्रमाणपत्र अभ्यासक्रम- आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र वा मानसशास्त्र यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • उपलब्ध जागांची संख्या व तपशील- वरील दोन्ही अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांची संख्या प्रत्येकी १२ असून त्यापैकी ६ जागा सरकारी नियमांनुसार राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
  • निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा ७ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ वा. घेण्यात येईल. वरील लेखी निवड परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ वा. मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
  • विशेष सूचना- अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यावर ३ महिन्यांची संबंधित क्षेत्रातील उमेदवारी करणे आवश्यक राहील.
  • अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून अर्जदारांनी ते सर्वसाधारण गटातील असल्यास १५० रु. चा (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी १०० रु.चा) डायरेक्टर, प्रोफेसर, महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ, पुणे-१ यांच्या नावे असलेला व पुणे येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र आरोग्य संस्था पुणेची जाहिरात पहावी अथवा संस्थेच्या दूरध्वनी क्र. ०२०- २६१२२७३३१ वर संपर्क साधावा.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक कागदपत्र व डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज संचालक, प्राध्यापक, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सवरेपचार रुग्णालय, परिसर, पुणे- ४११००१ या पत्त्यावर २१ जुलै २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

राज्यातील समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयातील ज्या पदव्युत्तर पात्रताधारकांना त्याच विषयातील पदव्युत्तर पदविका प्राप्त करायची असेल त्यांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी