पत्र पाठवल्यावर पुढचे काही दिवस उत्सुकतेत, अनामिक ओढीत गेले. एके दिवशी ऑफिसमधून  येताना दाराला पत्र लावलेलं दिसलं आणि त्याची कळी एकदम खुलली. दार उघडून बाकीचे नेहमीचे सोपस्कार करत बसण्यापेक्षा गडबडीने त्याने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली..
सारखा वाजणारा गजर बंद करून एकदाचा तो उठला आणि सवयीप्रमाणे मोबाइलमधले मेसेजेस चेक करत बसला. इतक्यात दारावरची घंटी वाजली. ‘शनिवारी सकाळी १० वाजता कोण आलं असावं’ असा विचार करत, आळोखे-पिळोखे देतच दार उघडून बघतो तर दारात कोणीच नाही, आणि कडीला एक पत्र लावलेलं!
‘मोबाइल, व्हॉट्सअपच्या जमान्यात पत्र? आणि तेही मला. मित्रांपैकीच कुणी मस्करी केली नाही ना?’ असा विचार करत त्यानं पत्ता वगैरे तपासला. आपलंच नाव आहे आणि पत्ताही बरोबर आहे. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे ‘प्रेषक’मध्ये एका मुलीचं नाव. ही काय भानगड? त्याला अंदाज येईना म्हणून उगाचच त्याने पत्राचा वास वगैरे घेऊन बघितला. पत्र काही वेगळं दिसतंय का म्हणून पुढून मागून बघितलं, पण काहीच नाही आणि हे गुप्तहेरी चाळे आपण दार उघडं ठेवूनच करतोय हे लक्षात आल्यावर एकदमच तो ओशाळला. कोणी बघितलं तर नाही याची खात्री करून त्यानं दार लावून घेतलं.
आत आल्यावर उगाचंच ते पत्र टेबलावर ठेवून पुन्हा एकदा प्रेषकाचं नाव वाचलं. आपलं नाव आणि पत्ताही पुन्हा पुन्हा वाचला. अक्षर तर चांगलं आहे. स्वत:चं नाव असं एखाद्या कागदावर हस्ताक्षरात वाचून किती दिवस, किती र्वष होऊन गेले याचा उगाच अंदाज लावीत तो बसला. खरं तर ते पत्र वाचायची आणि त्यातला मजकूर जाणून घेण्याची इच्छा त्याला होतीच. पण या उत्सुकतेच्या क्षणांचा एक वेगळाच आनंद त्याला मिळत होता आणि तो त्याला हरवायचा नव्हता. हस्तलिखित पत्राच्या निमित्ताने का होईना आपण जुन्या जमान्यात जाऊन पोचलो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, याचं त्याला वेगळंच अप्रूप वाटलं.
थोडय़ा वेळाने पत्र उघडून वाचल्यावर त्याच्या लक्षात आलं की, आपल्यासाठी वधूसंशोधन सुरू असल्यामुळे, घरच्यांनी आपलं नाव आणि पत्ता एका मासिकात दिला होता आणि हे पत्र इच्छुक वधूनेच लिहिलं होतं, ‘आपली जुजबी माहिती विचारण्यासाठी आणि भेटायचं का, कुठे वगैरे ते ठरवण्यासाठी हे पत्र पाठवीत आहे..’ असंच काही काही होतं पत्रात.  
‘पण आपला मोबाइलनंबर त्या मासिकात दिलेला असताना त्यांनी सरळ फोन का केला नाही, असा विचार करत घरी फोन करून एकदा खात्री करून घेऊ  म्हणून त्याने घरी फोन केला. घरच्यांशी बोलून मासिकाचं नाव पडताळलं आणि मुलीविषयी थोडीफार माहिती विचारून घेतली. सगळं ठीक आहे, म्हटल्यावर मुलीचा फोन नंबरही घेतला.
फोन करण्यापूर्वी त्याला वाटलं, आपण ‘इट का जवाब इटसे’ देऊ या ना. म्हणजे पत्राला उत्तर पत्रानेच देऊ . असेल एखादी मुलगी वेगळ्या विचारांची, पत्रलेखनावर विश्वास असणारी. आपणही काही कमी नाही. बघू तर जमतंय का? नाही तर फोन आहेच!
पहिल्यांदाच एका अनोळखी व्यक्तीला ‘पत्र’  लिहीत होता तो. मानसिक तयारी झाली. मात्र, हातात पत्र आणि पेन घेऊन बसल्यावर शब्दच सुचेनात. ठरवलं होतं, काय एवढं त्यात, चार ओळी खरडायच्या आणि द्यायचं पाठवून. पण खरडणं एवढं सोपं वाटेना. ‘बापरे ही मुलगी लेखिका वगैरे आहे की काय? हिनं कसं काय एवढं पत्र लिहिलं असेल? का हिला बोलण्याचा काही प्रॉब्लेम आहे म्हणून? जाऊ दे पत्रात हेच तर सगळं लिहू.’ असा विचार करत त्याने लिहायला सुरुवात केली. बऱ्याचदा खाडाखोड करून पत्र लिहून झाल्यावर वाटलं की हे झालंय आपल्या मनासारखं.. म्हणून परत एकदा वाचलं तर वाटलं की, अरे अजून काही सुधारणा हव्यात. मग विचार आला, जाऊ दे लॅपटॉप काढू, मराठीत टाइप करू आणि मग परत एकदा स्वच्छ कागदावर उतरवू. बापरे एवढे कष्ट (!!!), तेही एका मुलीसाठी, जिला आपण कधी भेटलो नाही, ओळखतपण नाही. काय गरज आहे? का त्या मुलीनेही घेतले असतील एवढे कष्ट आपल्यासाठी? ती तरी कुठे ओळखते आपल्याला? जाऊ  दे आता ठरवलंय ना, ‘इट का जवाब इटसे.’ पत्र लिहितोयच तर वाचणाऱ्याला (किंवा स्वत:ला तरी किमान) वाचावसं वाटेल असंच लिहू.
परत एकदा मनाचा हिय्या करून त्याने लॅपटॉप उघडला, बराच वेळ दिल्यावर मनासारखं पत्र लिहिलं गेलं आणि मग ते कागदावर उतरवून त्याने मोकळा श्वास घेतला.
पत्र पाठवल्यावर पुढचे काही दिवस उत्सुकतेत, अनामिक ओढीत गेले. एके दिवशी ऑफिसमधून येताना दाराला पत्र लावलेलं दिसलं आणि त्याची कळी एकदम खुलली. दार उघडून बाकीचे नेहमीचे सोपस्कार करत बसण्यापेक्षा गडबडीने त्याने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली. उत्सुकतेने आता आश्चर्यावर मात केली होती. पत्रातील मजकूर असा होता, ‘पत्राने संवाद साधण्यामागे माझे काही हेतू होते. एक तर आजकाल पत्रं लिहिली जात नाहीत, मोबाइलच्या युगात तर त्याचा कंटाळाच येतो. त्यामुळं एखाद्या अनोळख्या व्यक्तीसाठी तुम्ही हे कष्ट, हे अधिकचं पाऊल उचलाल का, ते मला पाहायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी असणारी एक अनामिक उत्सुकता मला अनुभवायची होती. फोनवर बोलून भेटलो, तर तो अनुभव मिळेलच असं सांगता येत नाही. कदाचित मिळेलही. पण आपण फोनवर बोललो नाही, त्यामुळे पत्राची वाट बघण्यात एक वेगळीच मजा आली. तुम्हीपण पत्रानेच उत्तर दिलंत त्यामुळे ती मजा मला अनुभवता आली.
सगळ्याच गोष्टी जशा फोनवर बोलता येत नाहीत तशा पत्रातूनही लिहिता येत नाहीत हे खरं, पण पत्रलेखनामुळे वेगळ्याच तारा छेडल्या जातात हेही तितकंच खरंच!
आणि महत्त्वाचं म्हणजे, ‘पत्र कोण लिहीत बसतंय वेडय़ासारखं,’ असा विचार करून तुम्ही माझ्या विचारांना झिडकारलं नाहीत, उलट आजच्या काळात थोडासा वेगळा वाटणारा हा प्रयोग करण्यात मला साथ दिलीत याबद्दल आभार! तुमच्यासारख्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला मला नक्कीच आवडेल..’
 पत्र वाचता वाचता नकळत त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि किती तरी वेळ ..    

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा