सात देशांतील मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशावर घातलेल्या बंदीमुळे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यास राजकीय रंग चढला. सादरकर्ते जिमी किमेल व ऑस्कर विजेत्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याच मुद्दय़ाला अनुसरून टीका केली.

लाखो अमेरिकी लोक व जगातील २२५ देशांचे लोक हा कार्यक्रम पाहात आहेत पण ते आता अमेरिकेचा तिरस्कार करतात. मला आठवते त्याप्रमाणे ऑस्करमध्ये गेल्यावर्षी वंशवादाची छाया होती तरी ते चित्रपटांसाठी चांगले वर्ष म्हणावे लागेल. कृष्णवर्णीयांनी नासाला वाचवले. श्वेतवर्णीयांनी जॅझला वाचवले त्याला तुम्ही प्रगती म्हणाला होतात, असे किमेल म्हणाले.

ट्रम्प यांनी मेरील स्टीपला तिच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारातील भाषणाबद्दल अहंकारी असे संबोधले होते. त्यावर किमेल यांनी वीस मिनिटे विनोद केले. मेरील स्ट्रीपची कामगिरी सुमार आहे, तिचा अभिनय चांगला नाही तरी तिने ५० चित्रपटांत किमान २० वेळा ऑस्कर नामांकन मिळवले असे ते उपरोधाने म्हणाले.

एका विजेत्याने त्याचे ऑस्कर स्थलांतरितांना अर्पण केले. लघुपटाचा पुरस्कार स्वीकारणारे निर्माते व दिग्दर्शक एझरा एडलमन यांनी राजकीय हिंसाचार व क्रूरतेचा बळी ठरलेल्यांच्यावतीने पुरस्कार स्वीकारला.

व्हायोला डेव्हीस हिने येथे जमलेल्या लोकांची क्षमता फार मोठी आहे पण त्यांची जागा स्मशानात आहे असे ती उपरोधाने म्हणाली. मूनलाईटचे दिग्दर्शक बॅरी जेनकिन्स यांनी सांगितले की, अकादमी तुमच्या पाठीशी आहे. पुढील चार वर्षे आम्ही तुम्हाला एकटे सोडणार नाही, आम्ही तुम्हाला विसरणार नाही.

टॅरेल अल्वीन मॅकक्रॅनी यांनी सांगितले की, त्या काळ्या, गहू वर्णीय मुलामुलींना जे लिंगभेद मानत नाहीत त्यांची कहाणी आम्ही चित्रपटात मांडली आहे. मूनलाईटच्या निर्मात्या अडेल रोमान्स्की यांनी पुरस्कार स्वीकारताना तो वंचित कृष्णवर्णीय मुले व गहू वर्णीय मुलींना अर्पण केला.

मेक्सिकन अभिनेते गेल गार्शिया बेर्नल यांनी ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाला विरोध करताना सांगितले की, माणूस म्हणून मी आम्हाला वेगळे करणाऱ्या कुठल्याही भिंतीच्या विरोधात आहे. इराणी चित्रपट निर्माते व द सेल्समनचे दिग्दर्शक असगर फरहादी यांना परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला पण ते उपस्थित नव्हते. ट्रम्प यांच्या आदेशाचा निषेध म्हणून ते अनुपस्थित राहिले.