चीनमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस व त्यामुळे आलेला पूर यांनी घातलेल्या थैमानात अडीचशेहून अधिक लोक ठार किंवा बेपत्ता झाले असून, सुमारे अडीच लाख लोक अद्यापही देशाच्या मध्यभागातील हुबेई प्रांतात अडकून पडले आहेत.

हुबेई प्रांतात गेल्या काही दिवसांत पुराने ११४ बळी घेतले असून १११ लोक बेपत्ता आहेत. याशिवाय हेनान प्रांतातील अन्यांग शहरात १८ जण मरण पावले असून नऊ जण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने केलेल्या विध्वंसातील बळीसंख्या १३२ वर पोहोचली असून बेपत्ता लोकांची संख्या १२० आहे.

गेल्या आठवडय़ात हेनान प्रांतातील पावसामुळे सर्वत्र पूर येऊन वाहतूक, वीजपुरवठा आणि दळणवळण खंडित झाले. याचा सगळ्यात मोठा फटका बसलेल्या अन्यांग शहरातून १ लाख ९२ हजार ७०० लोकांना इतरत्र हलवण्यात आले, तर ५४६०० हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट  झाली.