भाषेत काळानुरूप बदल होत जातात, त्यात काही नवीन शब्दांची भर पडते; तर काही शब्द न वापरल्याने काळाच्या पडद्याआड जातात. माव्‍‌र्हलस (अद्भुत), चिरियो  व पुसी कॅट (खेळकर मांजर) हे शब्द बोलण्यातून मागे पडल्याने ब्रिटनमध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
ब्रिटनमधील इंग्रजीवर अमेरिकी इंग्रजीचा पडलेला प्रभाव हे त्याचे कारण आहे. ब्रिटनमधील लोक आता अमेरिकी इंग्रजीतील जास्त शब्द वापरतात याला कारण डिजिटल क्रांती हे तर आहेच, शिवाय अमेरिकेचा वाढता प्रभावही त्याला कारणीभूत आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘माव्‍‌र्हलस’ या शब्दाऐवजी आता ‘ऑसम’ हा शब्द जास्तवेळा वापरला जातो, त्यामुळे माव्‍‌र्हलस हा शब्द मागे पडला. १ लाख शब्दात ऑसम हा शब्द ७२ वेळा वापरला जातो असे लँकेस्टर विद्यापीठ व केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसच्या संशोधन अहवालात म्हटले आहे. वीस वर्षांपूर्वी माव्‍‌र्हलस हा शब्द लाखात १५५ वेळा वापरला जात होता, आता तो दोनदाच वापरला जातो, असे ‘द टाईम्स’ ने म्हटले आहे. ऑसम (अद्भुत)या शब्दाचा वाढता वापर म्हणजे अमेरिकी इंग्रजीचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे, असे लँकेस्टर विद्यापीठाचे संशोधक टॉनी मॅकएनेरी यांनी म्हटले आहे. १९९० पासून जे शब्द लोकप्रिय ठरले त्यात ‘रिअली’ ऐवजी ‘इसेन्शियली’ वापरला जाऊ लागला. ‘जिम’ च्या जास्त वापराच्या अनुषंगाने ‘ट्रीम्डमील ’ (कंटाळवाणा नित्यक्रम) हा शब्द जास्त वापरला गेला. १९९० मध्ये आपण जेव्हा मांजरींविषयी बोलत असू तेव्हा ‘पुसी कॅट’ हा शब्द किमान निम्म्या वेळा वापरला जात असे, पण २०१० मध्ये पुसी हा शब्द वगळण्यात आला. ‘मिरर को डॉट युके’ या संकेतस्थळानुसार ‘फोर्थनाइट’ ऐवजी ‘टू विकस’ हा शब्द आला. वयस्कर लोक चिरियो (स्वागत करताना किंवा निरोप घेताना काढलेले उद्गार) शब्द वापरत असत. आता मार्मालेड (संत्रीचा मुरंबा)  हा शब्द जास्त वापरल्या जाणाऱ्या दहा शब्दांमधून बाहेर गेला.

अस्तंगत               उदय
माव्‍‌र्हलस               ऑसम
पुसी कॅट
चिरियो
रिअली                  इसेन्शियली
फोर्थ नाइट            टू विकस
मार्मालेड