परदेशातील काळा पैसाप्रकरणी केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर तीन नावे सादर केल्यानंतर आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आणखी १५ नावे जाहीर करीत त्यांचीही स्विस बॅंकेत खाती असल्याचा आरोप केला आहे.
केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये, रिलायन्सचे मुकेश अंबानी, अनिल अंबानी, कोलिकाबेन अंबानी, संदीप टंडन, अनु टंडन, नरेशकुमार गोयल यांचा समावेश असून, यांची स्विस बँकेत यांची खाती असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.  कोणतीही लपवाछपवी न करता केंद्र सरकारने काळा पैसा खातेधारकांची सर्व ८०० नावे जाहीर करावीत, असे आव्हानही त्यांनी केंद्राला दिले. या प्रकरणासंबंधीची चौकशी एका निर्धारित वेळेत पूर्ण करून दोषींवर कडक कारवाई करण्याचीही मागणी केजरीवाल यांनी केली.
दरम्यान, केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे परदेशातील काळा पैसा धारकांपैकी तीन जणांची नावे सादर केली. यामध्ये प्रदीप बर्मन, पंकज चमनलाल लोढिया आणि राधा टिम्ब्लू या उद्योगपतींचा समावेश आहे. तसेच सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काळा पैसा प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देखील दिले आहे.