वैज्ञानिकांनी प्रथमच अतिजास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरांची जोडी निष्क्रिय दीर्घिकेभोवती फिरताना शोधली आहे. युरोपीय अवकाश संस्थेच्या एक्सरे मल्टी मिरर मिशनने ही कामगिरी पार पाडली. एक्सएमएम-न्यूटन असे या मोहिमेचे नाव आहे.
 जेव्हा अवकाश वेधशाळा त्याचे निरीक्षण करीत होती तेव्हा त्यांनी ताऱ्याचे दोन भाग केले. दोन अति वस्तुमानाची कृष्णविवरे असून ती दीर्घिकेत एकमेकांभोवती फिरताना सापडली आहेत.
निरीक्षण शक्य
 दीर्घिकांना आताचा आकार व स्थिती कशी प्राप्त झाली असावी याचे निरीक्षण यात शक्य होणार आहे. आतापर्यंत फारच थोडी द्वैती कृष्णविवरे सापडली आहेत. पण ती सर्व सक्रिय दीर्घिकेत होती. अधिक वस्तुमानाची द्वैती कृष्णविवरांच्या अभ्यासातून दीर्घिका कशा तयार झाल्या असाव्यात याची माहिती मिळते. आतापर्यंत फार थोडी अगदी निकट असलेली द्वैती कृष्णविवरे सापडली आहेत, ती सगळी सक्रिय होती, तसेच वायूचे लोट बाहेर सोडणारी होती.
द्वैती कृष्णविवरे
 नव्या संशोधनानुसार ही द्वैती कृष्णविवरे निष्क्रियेत सापडली आहेत, असे बीजिंगच्या पेकिंग विद्यापीठातील फुकुन लिऊ यांनी म्हटले आहे, कारण ज्या दीर्घिकेत ही कृष्णविवरे सापडली आहेत ती निष्क्रिय आहे.
मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट ऑफ रेडिओनॉमीचे स्टेफनी कोमोसा यांनी सांगितले, की अनेक दीर्घिकांमध्ये द्वैती कृष्णविवरे आहेत, पण ती केंद्रस्थानी आहेत त्यांना शोधणे फार अवघड असते, कारण त्यात वायुमेघ नसतात व दीर्घिकांचे गाभे काळे असतात. १० जून २०१० रोजी एसडीएसएस जे १२०१३६ या दीर्घिकेत या द्वैती कृष्णविवरांचे अस्तित्व जाणवणारी खगोलीय घटना घडली होती.
त्या वेळी क्ष किरण हे २७ ते ४८ दिवस निरीक्षण पातळीच्या खाली होते. त्यानंतर ते दिसले व परत निष्प्रभ होत गेले. एक कृष्णविवर दुसऱ्याची प्रदक्षिणा करीत असेल त्या वेळी नेमके असेच घडत असते.
यातील मूळ कृष्णविवर हे १ कोटी सौर वस्तुमानाचे असून ते १० लाख सौर वस्तुमान असलेल्या कृष्णविवराभोवती अंडाकार कक्षेत फिरत आहे. दोन कृष्णविवरांतील अंतर ०.६ मिलीपार्सेक  म्हणजे २००० प्रकाशवर्षे आहे. म्हणजे हे अंतर सौरमालेच्या रुंदीइतके आहे.