२००४ ते २०१३ दरम्यान, म्हणजे यूपीए सरकारच्या कार्यकाळात ५०५ अब्ज डॉलर इतका काळा पैसा देशाबाहेर पाठवण्यात आला काय, याची शहानिशा करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने तपास सुरू केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ने निर्देश दिल्यानंतर डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सचा (डीआरआय) हा तपास सुरू होत आहे.
देशातून प्रचंड प्रमाणावर काळा पैसा बाहेर जाण्याच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो आणि २००४ ते २०१३ या कालावधीत दरवर्षी ५१ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम दरवर्षी बाहेर पाठवण्यात आली, असे अमेरिकेतील ‘ग्लोबल फायनान्स इंटीग्रिटी’ (जीएफआय) या थिंक टँकच्या अहवालात नमूद केले होते. त्याच्या आधारे हा तपास करण्यात येत आहे. डीआरआयच्या तपासाचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष तपास पथक या संदर्भात योग्य ती कार्यवाही करणार आहे.