ब्रिटनच्या शाळेतील प्रकार

आयसिस या दहशतवादी संघटनेने एका व्यक्तीचा शिरच्छेद केलेला भयानक व्हिडीओ ऑनलाइन पाहिल्यानंतर १० वर्षीय शाळकरी मुलाने भर वर्गात आयसिसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लंडनस्थित हारून या मुलाने हा प्रकार केला असून, शाळेतील मुलांनी त्रास दिल्यानंतर आपण याकडे वळलो असल्याचे त्याने सांगितले.

एका व्यक्तीचे हात मागे बांधून त्याला आणण्यात आले. यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. आणि खाली बसण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा शिरच्छेद करण्यात आला, असे या मुलाने यावेळी सांगितले. प्रत्येक जण बाहेर खेळत असताना मला माझ्या खोलीमध्ये संगणकावर मुक्तपणे खेळता येत असल्याचे त्याने म्हटले.

नोव्हेंबर २०१५ मध्ये आयसिसने पॅरिसवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर मी या संघटनेचे व्हिडीओ पाहू लागलो. तसेच त्यांच्याबाबतच्या बातम्या, लेख आणि लघुपट पाहण्यासही मी सुरुवात केली, असे त्याने सांगितले.

तो आयसिसशी संबंधित व्हिडीओ गेम खेळत असल्याचे समोर आले असून, त्याला त्याच्या वर्गमित्रांकडून ‘दहशतवादी’ म्हटले असल्याचे त्याने म्हटले आहे.