सीबीएसईच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सीबीएसईच्या परीक्षेचा ९७.३२ टक्के निकाल लागला असून यामध्ये ९७.८२ टक्के मुली, तर ९६.९८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. यंदा एकूण १३ लाखांहून अधिक विद्यार्थी परिक्षेला बसले होते. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या संकेतस्थळांवर निकाल पाहता येतील.
दरम्यान, मागील वर्षीच्या निकालाच्या टक्केवारीपेक्षा यंदाचा निकाल कमी लागला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल ९८.८७ टक्के इतका लागला होता. यंदा हे प्रमाण कमी होऊन ९७.३२ इतके आहे.