अण्वस्त्रप्रसार विरोधी करारावर (नॉन- प्रोलिफरेशन ट्रीटी ) स्वाक्षरी करणे हा विस्तारीकरणाच ‘महत्त्वाचा’ भाग असल्याचे ४८ देशांच्या गटातील बहुतेक सदस्यांचे मत होते, असे सांगून अणुपुरवठादार गटात (एनएसजी) भारताचा प्रवेश रोखण्याच्या आपल्या कृतीचे चीनने शुक्रवारी समर्थन केले.
संबंधितांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी अण्वस्त्रप्रसार विरोधी करार (न्यूक्लिअर नॉन- प्रोलिफरेशन ट्रीटी – एनपीटी) केवळ चीनच नव्हे, तर एनएसजीच्या अनेक सदस्यांचे मत होते, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले.पाकिस्तानचा एनएसजीमध्ये प्रवेश व्हावा यासाठी चीन जोमाने प्रयत्न करत असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता लु म्हणाले, की एनएसजी हा एनपीटीचा महत्त्वाचा भाग असून, आंतरराष्ट्रीय समुदायाचे त्याबाबत बऱ्याच काळापासून सहमत आहे. भारत हा एनएसजीचा भाग नसला, तरी या सहमतीला भारतही मान्यता देतो, असा दावा त्यांनी केला.