25 September 2017

News Flash

भारतातील परकीय गुंतवणुकीवर चीननं शांत राहावं; चिनी माध्यमांचा सरकारला घरचा आहेर

ग्लोबल टाईम्सचा चीन सरकारला सल्ला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 12:24 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग. (संग्रहित)

भारत, चीन आणि भूतान सीमेवरील डोक्लाम प्रांतात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर चिनी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने भारताच्या विकासावर भाष्य केले आहे. ‘भारताच्या प्रगतीवर चीनने शांत रहावे,’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. भारतातील परकीय गुंतवणुकीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे चीनने भारताशी दोन हात न करता देशाच्या विकासाची योजना आखावी, असे ग्लोबल टाईम्सने लेखात म्हटले आहे.

‘परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. त्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली होत आहे. भारतात औद्योगिक विकास वेगाने होत असल्याने रोजगारांमध्ये वाढ झाली आहे. भारताच्या विकासाचा वेग पाहता, चीनने शांत राहून भारताचा सामना करण्यासाठी रणनिती आखायला हवी,’ असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ग्लोबल टाईम्सने ‘भारताचे चीनप्रमाणे औद्योगिक विकासाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू,’ या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे.

‘परदेशातील अनेक कंपन्या भारतात मोठी गुंतवणूक करत आहेत. यामध्ये चीनमधील काही कंपन्यांचादेखील समावेश आहे. यामुळे भारताची निर्मिती क्षमता वाढेल आणि त्याचा मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याने रोजगार वाढेल. यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होईल,’ असे वृत्तपत्राने लेखात म्हटले आहे. चीननेदेखील परकीय गुंतवणूक आकर्षून घेत औद्योगिक विकास साधला होता, असेही या वृत्तपत्राने नमूद केले आहे.

भारत आणि चीनमधील संबंध सध्या प्रचंड ताणलेले आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोक्लाममध्ये चीनकडून रस्त्याची निर्मिती केली जाते आहे. भारतीय सैन्याने चिनी सैन्याच्या रस्ते निर्मितीच्या कामाला विरोध केला आहे. त्यामुळे सिक्किम सीमेवर दोन्ही देशांचे जवान आमनेसामने उभे ठाकले आहेत. भारताने सैन्य मागे घ्यावे, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे इशारे वारंवार चीनकडून देण्यात आले आहेत. मात्र चीनच्या धमक्यांना किंमत न देता भारतीय सैन्य सिक्किममध्ये पाय रोवून उभे आहे.

First Published on July 17, 2017 11:54 am

Web Title: china should keep calm about indias development says global times
 1. R
  RJ
  Jul 17, 2017 at 8:29 pm
  चिनी माध्यमे असे काही स्वतंत्र अस्तित्वात आहे ?
  Reply
  1. A
   A.A.houdhari
   Jul 17, 2017 at 2:28 pm
   ग्लोबल टाइम्सला काहीही लिहूदे. आपण मात्र सावध राहिले पाहिजे. चायनीज लोक बेभरवशाचे असतात .
   Reply
   1. A
    Ameya
    Jul 17, 2017 at 1:27 pm
    सगळ्या जगाला भारताचा विकास होताना दिसत आहे, आणि ते अआशावादी देखील आहे. आपल्याकडच्या काँग्रेस धार्जिण्या माध्यमांना मात्र यातले काही दिसत नाही. जो अर्थशास्त्र जाणतो तो हे नक्कीच समजतो कि विकास ही काही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही, ती एक हळूहळू दिसून येणारी गोष्ट आहे, त्यामुळे मोदींचे परदेश दौरे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प इत्यादींची फळे आपणास येत्या ४-५ वर्षात मिळतील. सध्याच्या सरकारमुळे विका चालना मिळत आहे ज्याची फळे हळूहळू मिळतील. हे काँग्रेस आणि इतर सेक्युलर मंडळींना माहीत आहे आणि त्यामुळे ते कसोशीने प्रयत्न करून देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.
    Reply
    1. A
     ajay
     Jul 17, 2017 at 1:21 pm
     हे बोलता एक आणि करता अनेक, बेसावध न राहणे हेच उत्तम! आम्ही तसे वागणार नाही आणि तसे च वागणार ही ह्यांची पद्धत
     Reply
     1. R
      ravi
      Jul 17, 2017 at 12:41 pm
      भारताची अर्हतीक प्रगती होत आहे हे राहुल गांधीला सांगा पुढच्या वेळी तो तुम्हाला भेटेल तेव्हा. रोज उठून बोलत असतो कि भारताची अधोगती होत आहे ते.
      Reply
      1. Load More Comments