पृथ्वीवरील नंदनवनासह नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडील सर्वच राज्यांमध्ये थंडीच्या सरासरीचे उच्चांक मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये अत्यंत कडक हिवाळ्याचा ४० दिवसांचा विशेष कालावधी सुरू झाला आहे, हा कालावधी ‘चिलई कलन’ या नावाने ओळखला जातो. देशाच्या राजधानीत कमाल तापमान १५ अंश तर किमान तापमान ६.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. श्रीनगरचे तापमान उणे ४.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.