मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्याच्या ऊर्जा विकास महामंडळाला नोटीस जारी करून एका याचिकेवर त्यांना उत्तर मागितले आहे. येथील काही सौरऊर्जा संयंत्रांचा दर्जा अतिशय खराब असून, यामुळे येथील संस्थांमध्ये जन्म घेणाऱ्या अनेक लहान बालकांचे जीवन धोक्यात असल्याचे जनहित याचिकेमध्ये म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुशील लेवी यांच्याद्वारा दाखल करण्यात आलेल्या याचिकेत हा दावा करण्यात आला आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जासंबंधित उपक्रमांतर्गत ऊर्जा विकास निगमकडून विदिशा जिल्हय़ामध्ये सात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लावण्यात आलेल्या सौरऊर्जा संयंत्रातील बॅटरी पॉवर बॅक क्षमता कमी करण्यात आली असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

 

दिल्लीतील सफदरजंग विमानळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीतील महत्त्वपूर्ण सफदरजंग विमानतळावर लवकरच निमलष्करी दलाकडून सशस्त्र संरक्षण पुरविण्यात येणार आहे. येथून होत असलेल्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरांच्या उड्डाणाला असणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

केंद्रीय सुरक्षा संस्थांनी दिलेल्या सूचनेनुसार, दिल्लीतील हाय प्रोफाइल ठिकाण असलेल्या या भागाचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले असून, भविष्यातील धोके टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

जवळपास २०० एकरांचा परिसर असलेल्या या विमानतळावर सध्या भारतीय रिझव्र्ह बटालियनकडून (आयआरबी) सुरक्षा पुरविण्यात येत आहे. या विमानतळावरून विविध हेलिकॉप्टर उड्डाणे घेत असतात.