एका विचित्र घटनेत डॉक्टरांनी एका उद्योजकाच्या पोटातून प्रत्येकी ३३ ग्रॅम वजनाची १२ सोन्याची बिस्किटे बाहेर काढली. हा उद्योजक ६३ वर्षे वयाचा आहे. पाण्याची बाटलीचे झाकण आपण गिळले असून ते बाहेर काढण्यासाठी आपण येथे आलो आहोत असे त्याने डॉक्टरांना सांगितले. सर गंगाराम रूग्णालयाचे सल्लागार शल्यविशारद डॉ.सी.एस. रामचंद्रन यांनी सांगितले , आम्ही क्ष किरण तपासणी केली असता पाण्याच्या बाटलीचे झाकण दिसले नाही. सोन्याची बिस्किटे एकापाठोपाठ एक आतडय़ात चिकटलेले दिसली, नंतर डॉक्टरांनी ९ एप्रिलला या उद्योजकाच्या पोटातून १२सोन्याची बिस्किटे काढली. त्यानंतर रूग्णालय अधिकाऱ्यांनी या घटनेची  माहिती पोलीस व सीमा शुल्क अधिकाऱ्यांना दिली.