इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्यासह १०४ आरोपींना तेथील न्यायालयाने तुरुंग फोडून कैद्यांना मुक्त केल्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा सुनावली. जानेवारी २०११ मध्ये झालेल्या उठावात इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष होस्नी मुबारक यांची राजवट उलथून टाकण्यात आली. त्या वेळी तीन ठिकाणचे तुरुंग फोडून २०,००० कैद्यांनी पलायन केले होते. या खटल्यात मोर्सी यांच्यासह मुस्लीम ब्रदरहूड या पक्षाच्या अनेक नेत्यांवर कट करणे, सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणे, असे आरोप होते.