गंगा तसेच सोन नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बिहारमधील अनेक गावात पूर आला आहे. या पूरामुळे आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित करावे लागले आहे. तर अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम एनडीआरएफच्या जवानांकडून सुरू आहे. जवळपास १० लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेतली. पूरग्रस्तासाठी मदत करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मदत करण्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे. पूरग्रस्तांसाठी शक्य तितकी मदत लवकरात लवकर पाठवण्यात येईल असेही मोदींनी सांगितले.
सोमवारी सोन नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली, तसेच गंगा आणि इतर नदींनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पटणासहित इतर बारा जिल्ह्यांना पूराचा जास्त फटका बसला आहे. या बारा ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर वीस जिल्ह्यांत देखील पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सोन नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता अधिक एनडीआरएफच्या तुकड्या उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्याची शक्यता आहे. सुरक्षित स्थळी हलवलेल्या विस्थापितांसाठी १६२ छावण्या उभारण्यात आल्या आहेत. पुरामुळे युपीमधीली गावच्या गाव पाण्याखाली गेले आहेत. तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ३० हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.